08 March 2021

News Flash

अजब… कार चोरीच्या २० दिवसांनंतर पोलिसांनी मालकालाच गाडीच्या फोटोसह पाठवलं ‘ओव्हरस्पीड’चं चलान

"जोपर्यंत मला चलान मिळालं नव्हतं तोपर्यंत चोरांनी कार विकली असेल असाच विचार मी करत होतो...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी एका व्यक्तीला त्याची कार चोरी झाल्याच्या २० दिवसांनंतर चक्क त्याच कारसाठी ‘ओव्हरस्पीड’चं चालान पाठवलं आहे. पश्चिम दिल्लीच्या हरी नगरचे रहिवासी योगेश पोद्दार यांची गाडी 6 जून रोजी चोरी झाली. तेव्हापासून त्या कारबाबत काहीही माहिती मिळालेली नाही, पण कार चोरी झाल्याच्या 20 दिवसांनंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना वेगात गाडी चालवून नियमाचं उल्लंघन केल्याबाबत गाडीच्या फोटोसह चलान पाठवलं आहे.

योगेश पोद्दार यांची कार 20 दिवसांपूर्वी विवेक विहार पोलिस स्थानकाजवळून चोरी झाली होती. 5 जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास योगेश पोद्दार त्यांची कार विवेक विहार पोलिस स्थानकाजवळ पार्क करुन नातेवाईकांच्या घरी मुक्कामी गेले होते. पण दुसऱ्या दिवशी आल्यावर त्यांची कार तिथे नव्हती. झिलमिल कॉलनीतला रस्ता छोटा असल्याने मुख्य रस्त्यावर पोलिस स्थानकाजवळ गाडी पार्क करुन नातेवाईकांकडे गेलो होतो, असे पोद्दार यांनी सांगितले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत त्यांनी ऑनलाइन एफआयरही दाखल केली होती. त्यानंतर थेट 30 जून रोजी पोद्दार यांना चक्क गाडीच्या फोटोसह चालान पाठवण्यात आले.

“जोपर्यंत मला चलान मिळालं नव्हतं तोपर्यंत चोरांनी कार दिल्लीच्या बाहेर विकली असेल असाच विचार मी करत होतो. पण आज गाडीच्या फोटोसह चलान आल्यानंतर मला धक्काच बसला. गाडीचा रंग, रजिस्ट्रेशन नंबर काहीही बदललेलं नाही. फक्त डॅशबॉर्डवरच्या काही वस्तू गायब आहेत. तरीही पोलिसांना अजून माझ्या गाडीचा शोध घेता येत नाही”, असे पोद्दार म्हणाले.  तर, ‘ज्या ठिकाणाहून कार चोरी झाली तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, पण परिसरातील अन्य सीसीटीव्हीच्या आधारे कार चोरांचा तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता पण चोर दिसले नाहीत असे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी याच महिन्याच्या सुरूवातीला दिल्लीच्या एका न्यायाधीशाच्या पतीलाही त्यांची कार चोरी झाल्याच्या दोन महिन्यांनतर वेगात गाडी चालवल्याचं चलान पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 9:40 am

Web Title: man from delhi gets challan for speeding over 20 days after car was stolen sas 89
Next Stories
1 Viral Video : म्हशींचा कळप जंगलाच्या राजा-राणीवरच हल्ला करतो अन्…
2 १२ सिंह एकत्र कधी पाहिलेत का? हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
3 नवरदेवानं एकाच मांडवात दोघींबरोबर केलं लग्न; एक प्रेयसी तर दुसरी …
Just Now!
X