गणपती गेले की ‘चैन पडेना आम्हाला’ या आपल्या मन:स्थितीतून बाहेर येऊन आपल्याला नवरात्रीचे वेध लागले आहेत. २९ सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. आहे. २९ सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो.

गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी यामागची धारणा आहे. एकोपा आणि समानतेचा संदेश यातून दिला जातो.

  • यंदा नवरात्रीतील नऊ रंग

२९ सप्टेंबर २०१९ – भगवा
३० सप्टेबर २०१९ – पांढरा
१ ऑक्टोबर २०१९ – लाल
२ ऑक्टोबर २०१९ – निळा
३ ऑक्टोबर २०१९ – पिवळा
४ ऑक्टोबर २०१९ – हिरवा
५ ऑक्टोबर २०१९ – राखाडी
६ ऑक्टोबर २०१९ – जांभळा
७ ऑक्टोबर २०१९ – मोरपंखी

खरंतर धर्मशास्त्रात रंगांची प्रथा नाही. नवरात्रीत नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधरण दहा पंधरा वर्षांपासून सुरू झाल्याचं खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे. नऊ दिवसांत या रंगांमुळे साऱ्याजणी एकमेकींच्या जवळ येतात. त्यांच्यामध्ये समानता दिसते. या दिवसात गरीब- श्रीमंत अशी दरी दिसत नाही. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते. हे रंग एकमेकींना बांधून ठेवतात. म्हणून एकोपा, समानता यावी यासाठी नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली.