News Flash

धक्कादायक! पाठवणीवेळी अति रडल्यामुळे नववधूला आला ‘हार्टअटॅक’, झाला मृत्यू

रड-रड रडल्यानंतर नवरीला आला 'हार्टअटॅक',आयुष्यातील सुखाचे दिवस पाहाण्याआधीच मृत्यूने गाठले

(प्रातिनिधिक छायाचित्र)

लग्नानंतर पाठवणीवेळी माहेर सोडताना नवरीला रडायला येणं सामान्य बाब आहे. पण, ओडिशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पाठवणीवेळी एक नववधू इतकी रडली की तिला हृदयविकाराचा झटका आला व जागीच तिचा मृत्यू झाला.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ओडिशाच्या सोनेपूर जिल्ह्यातील ही घटना असून गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी असं मृत नवरीचं नाव आहे. शुक्रवारी बालानगीर इथे राहणाऱ्या बिसीकेसन याच्यासोबत रोझीचं लग्न झालं. लग्नानंतर पाठवणीची वेळ आल्यापासूनच रोझीला रडू अनावर होत होतं. सतत रडत असतानाच बेशुद्ध होऊन ती जमिनीवर कोसळली. लगेचच नातेवाईकांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तिच्या हाताची मालिश व तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पण, तरीही ती न उठल्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. इंडिया टुडेसोबत बोलताना गावातील एका व्यक्तीने सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच रोझीच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे ती तणावात होती. तिच्या काही नातलगांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. पण, आयुष्यातील सुखाचे दिवस पाहाण्याआधीच तिला मृत्यूने गाठलं व आनंदाच्या वातावरणावर एका क्षणात विरजण पडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 2:05 pm

Web Title: odisha sonepur bride suffers heart attack due to excessive crying during bidaai dies sas 89
Next Stories
1 लोचा झाला रे! लग्नासाठी चार तरुणांसोबत पळाली; पण लगीनगाठ बांधण्यावरून ‘कन्फ्यूज’ झाली, अन्…
2 सतत काय ‘टिवटिव’ करतात भारतीय महिला, सर्वेमधून समोर आली ‘इंटरेस्टिंग’ माहिती 
3 सेलमध्ये अडीच हजारांना खरेदी केलेलं चिनी मातीचं भांडं; आता त्यासाठीच मिळणार साडेतीन कोटी
Just Now!
X