केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीच्याच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्या-मंगळवारच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह विरोधकांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला. प्रत्यक्षात लढाईबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही या शेतकरी आंदोलनावरुन दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एकीकडे या आंदोलनामधील व्यक्ती शेतकरी नसल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या नावाखाली सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांना समर्थन दिलं जात असल्याचा आरोप आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तर आंदोलनाला पाठिंबा देणारे आपली बाजू मांडत आहे.

दिल्लीच्या सीमांजवळ सुरु असणाऱ्या या आंदोलनातील सोयी सुविधांचे खरे तसेच काही जुने फोटो व्हायरल करुन या आंदोलनात सहभागी झालेल्यांबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. अगदी फूट मसाजर्सपासून ते पिझ्झा खाण्यापर्यंतचे अनेक फोटो पोस्ट करत या आंदोलनामधील नक्की लोकं कोण आहेत यासंदर्भात तपास केला पाहिजे अशी टीका केली आहे. आंदोलकांसाठी तयार केल्या जाणाऱ्या खाण्यामध्ये पिझ्झा आहे असे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

१)

२)

३)

४)

५)

मात्र आता याच संदर्भातील एका वृत्तावरुन काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे. शेतकरी आंदोलनात पिझ्झा कसा असा प्रश्न विचारणाऱ्यांना थरुर यांनी शेतकऱ्यामुळेच पिझ्झा आणि त्यावरील सर्व गोष्टी या संताप व्यक्त करणाऱ्यांना मिळतात असं थरुर यांनी व्यक्त केलं आहे. “आधी बिर्याणी आणि आता पिझ्झा : शेतकऱ्यांसाठी महागडं जेवण, नेटकरी संतापले” या हेडिंगच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना थरुर यांनी. “या संताप व्यक्त करणाऱ्यांना नेटकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पिझ्झामधील आणि वरील सर्व गोष्टी या मुळात शेतकऱ्यांमुळेच मिळतात,” असा टोला थरुर यांनी लगावला आहे.


दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक सेवाभावी संस्था, शीख सुमदायातील स्वयंसेवक आणि लहान मोठ्या व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने या शेतकऱ्यांना मदत करत आहेत. कोणी पाणी वाटप करतयं तर कोणी मोफत खाण्याचे स्टॉल लावले आहेत.