News Flash

मेसेजच्या कटकटीने वैतागलेल्यांसाठी व्हॉट्सअॅपने आणलंय ‘हे’ नवं फिचर

या समस्येपासून सुटका मिळणार

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यामध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे, व्हॉट्सअॅप शिवाय आपले कोणतेच काम होऊ शकत नाही इतके आपण त्याच्यावर अवलंबून असतो. नाही का? पण या व्हॉट्सअॅपचा कधी कधी फारच त्रास होतो राव! ऑफिसचा ग्रुप, शाळेचा ग्रुप, फॅमिली ग्रुप, कॉलेज ग्रुप, सोसायटीचा ग्रुप, मित्रांचा ग्रुप, मैत्रिणींचा ग्रुप असे एक ना दोन किमान दहा एक ग्रुपमध्ये आपण अॅड असतो. तेव्हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या ग्रुपवर सतत काही ना काही मेसेज पडत असतात. त्यावर रोज त्याच त्याच फॉरवर्ड मेसेजचा कचरा पाहून आणखी वैतागायला होतं. ढीगभर मेसेज जमा झाले की आपण उत्साहात व्हॉट्सअॅप ऑन करतो पण चॅट लिस्ट चेक करायला गेले की नेमका हिरमोड होतो. कारण आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तींचे मेसेज त्यात नसतात. कधी कधी तर हे चॅट कुठेतरी खाली जातात जे आपल्याला मेसेजच्या गर्दीत लक्षातही येत नाही. तेव्हा हीच समस्या तुमची देखील असेल तर लवकरच तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने नवे फिचर आणले आहे.

या फिचरमुळे आता युजर्स आपल्या चॅटचा प्राधान्यक्रम ठरवू शकतात. युजर्स त्याच्या चॅट लिस्टमध्ये असलेले कोणतेही तीन नंबर किंवा ग्रुप चॅट लिस्टमध्ये प्राधान्य क्रमाने वर ठेवू शकतात. समजा तुम्हाला ऑफिसचा ग्रुप महत्त्वाचा वाटतो तर युजर्स त्या ग्रुपवर ‘पिन’ मार्क करून तो ग्रुप चॅट लिस्टमध्ये वर ठेवू शकतो जेणेकरून चॅटबॉक्स उघडल्यानंतर तो ग्रुप किंवा एखादा नंबर तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपवरची प्राधान्यक्रमाने वर हव्या असलेल्या चॅटवर क्लिक करून ठेवावं लागेल. त्यांनंतर डिलिट, म्यूट आणि अर्काइव्ह या पर्यायांबरोबर पिनचा आयकॉनही दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही चॅटचा प्राधान्यक्रम ठरवू शकतात. या फिचर्समुळे तुमचे काम अधिक सोपे होणार आहे. युजर्स हा प्राधान्यक्रम त्यांना हवा तेव्हा बदलूही शकतात. अँड्राईडच्या २.१७. १६२ आणि २.१७. १६३ व्हर्जनवर हे फिचर उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2017 4:44 pm

Web Title: pin message feature on whatsapp android
Next Stories
1 नेपाळमधल्या गर्भश्रीमंत व्यावसायिकाचा भारतात राजेशाही पद्धतीने विवाहसोहळा
2 VIRAL : भांडणं सोडवायला गेला आणि नोकरी गमावून बसला!
3 Viral Video : बस ड्रायव्हिंग की व्हिडिओ गेमिंग…?, श्वास रोखायला लावणारा थरार
Just Now!
X