18 October 2019

News Flash

आधार कार्ड हरवलं तर काळजी नको; एका मेसेजवर करा लॉक

जाणून घ्या आधार लॉक आणि अनलॉक करण्याची पद्धत

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

कोणत्याही सरकारी कामांसाठी सध्या आधारकार्ड अनिवार्य आहे. शाळा, कॉलेज, बँक खाते आणि सिमकार्ड खरेदीसाठीदेखील आधार कार्ड गरजेचे आहे. आज एक महत्वपूर्ण ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्वाचे झाले आहे. पण काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड हरवले तर परिस्थिती गंभीर होते. काही वेळा त्याचा गैरवापर होण्याचा धोका असतो. अशा वेळी काय करावे या विचाराने गोंधळायला होते. चिंता करु नका. आता हरवलेले आधार कार्ड एका मेसेजद्वारे लॉक करता येणार आहे. यूआयडीएआयने आणलेल्या नव्या फिचरद्वारे तुम्ही आधार नंबर लॉक किंवा अनलॉक करु शकता.

यूआयडीएआयने आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. आता आणलेल्या या फिचरमुळे तुमचा आधार डेटा सुरक्षित राहून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनाही आटोक्यात आणल्या जाऊ शकतात.

कसे कराल आधार लॉक?

आधार कार्ड लॉक करण्यासाठी कार्ड धारकाला १९४७ या क्रमांकावर ‘GETOTP’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी मिळाल्यानंतर कार्ड धारकाने ‘LOCKUID’ असे लिहून एक स्पेस द्यावा. पुढे आधार नंबर आणि मिळालेला ओटीपी लिहून तो मेसेज १९४७ या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर तुमचा आधार नंबर लॉक करण्यात येईल.

कसे कराल आधार अनलॉक?

तुमचा आधार नंबर लॉक केल्यानंतर तो काही वेळा नंतर पुन्हा अनलॉक देखील करता येतो. तुमच्या रजिस्टर असलेल्या मोबाईलनंबर वरुन ‘GETOTP’ असे लिहून १९४७ या क्रमांकावर मेसे पाठवा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यात येईल. तो व्हेरिफाय झाल्यानंतर पुन्हा ‘UNLOCKID’ असे लिहून पुढे आधार नंबर लिहा. हा मेसेज पुन्हा १९४७ या क्रमांकावर पाठवा. काही वेळातच तुमचा आधार नंबर पुन्हा अनलॉक होईल.

First Published on October 10, 2019 2:13 pm

Web Title: steps to lock and unlock aadhar number avb 95