रविवार २१ जून रोजी भारतातील अनेक शहरांमधून सूर्यग्रहण पहायला मिळालं. पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतून कंकणाकृती सूर्यग्रहण तर महाराष्ट्रात खंडग्रास ग्रहण पाहण्याची संधी मिळाली. अनेकांनी या ग्रहणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर शेअर केले. व्हॉट्सअपवरही ग्रहणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पहायला मिळालं. असं असतानाच काही अकाउंटवरुन थेट अंतराळामधून हे ग्रहण कसं दिसलं त्याची झकल दाखवणारे फोटो आणि जीफ इमेजेस शेअर करण्यात आल्या आहेत.

इंटर नॅशनल स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या क्रीस कॅसडी या अंतराळवीराने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन अंतराळातून हे सूर्यग्रहण कसं दिसलं याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याचप्रमाणे काही अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थांनी सॅटेलाइटच्या माध्यमातून काढलेले फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

“सूर्यग्रहणाचे काय सुंदर दृष्य आहे. आम्ही सकाळी चीनवरुन जाताना ही दृष्य टिपली आहेत,” असं क्रिसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. क्रिसने हे फोटो काढले तेव्हा स्पेस स्टेशन हे पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावरुन प्रवास करत होते.

तीन हजारहून अधिक जणांनी क्रिसने शेअर केलेले हे फोटो रिट्विट केले आहेत तर १५ हजारहून अधिक जणांनी लाइक केले आहेत. इतरही काही संस्थांनी या ग्रहणाच्या सॅटेलाइट इमेज आणि जीफ शेअर केल्या आहेत.

आता रशियन स्टॅलेटाइच्या नजरेतून दिसलेल्या ग्रहणाचे हे दृष्य पाहा

आणि ही आणखी एक जीफ इमेज पाहा

खरोखरच पृथ्वीप्रमाणेच अंतराळामधूनही ग्रहण खूपच सुंदर दिसते असंच हे फोटो आणि जीफ इमेजेस पाहिल्यावर म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करुन नक्की कळवा.