News Flash

खूशखबर!; ट्विटची अक्षरमर्यादा वाढली

आता अधिक मोकळे होता येणार

ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अनेकांसाठी अडचणीची ठरत होती. ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ट्विपल्ससाठी खूशखबर आहे, कारण ट्विटरनं ट्विटची अक्षरमर्यादा वाढवून ती २८० अक्षरांची केली आहे. गेल्या वर्षी ट्विटरकडून ही अक्षरमर्यादा १४० पर्यंत वाढवण्यात आली होती, पण ती आणखी वाढवावी अशी ट्विपल्सनं मागणी केली होती. व्यक्त होण्यासाठी १४० अक्षरं खूपच कमी पडतात असं अनेकांचं म्हणणं होतं, त्यानुसार ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून संदेशासाठीची अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ट्विपल्स १४० ऐवजी २८० अक्षरांमध्ये ट्विट करू शकतात.

Viral Video : फिल्मी स्टाईलनं करायचे चोरी, चालकानं केला पर्दाफाश

ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अनेकांसाठी अडचणीची ठरत होती. अनेक युजर्सनी तशी तक्रारही केली होती. म्हणूनच ट्विटरकडून अक्षरमर्यादा दुपटीने म्हणजे २८० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सप्टेंबर महिन्यात ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांच्याकडून २४० अक्षरांचे पहिले ट्विट करण्यात आले होते. ‘हा बदल लहानसा आहे, पण आमच्यासाठी खूप मोठे पाऊल आहे. यापूर्वी ट्विटसाठी १४० शब्दांची तांत्रिक मर्यादा होती. लोकांना ट्विट करताना येणाऱ्या खऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमच्या टीमने विचारपूर्वक जे बदल केले आहेत, त्याचा अभिमान वाटतो’, असे डोर्सी यांनी ट्विटमध्ये लिहिले होते. ट्विटरनं सप्टेंबर महिन्यात अक्षरमर्यादा वाढवण्याचा प्रयोग केला होता, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शब्दमर्यादा वाढवण्यात आली आहे.

इंग्रजी भाषेत ट्विट करणाऱ्यांसाठी २८० अक्षरांची मर्यादा असणार आहे पण, जे युजर्स चिनी, जपानी किंवा कोरियन भाषेत ट्विट करणार आहेत. त्यांच्यासाठी मात्र ही मर्यादा १४० अक्षरांचीच असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 10:13 am

Web Title: twitter announced officially expanding the character limit to 280 for all users
Next Stories
1 अन् त्याने ब्रेकअपनंतर प्रेमाचा ‘बाजार’ मांडला
2 Viral Video : फिल्मी स्टाईलनं करायचे चोरी, चालकानं केला पर्दाफाश
3 सचिनचा ‘तो’ सगळ्यात ‘बेस्ट शॉट’; मुंबई पोलिसांचे ट्विट
Just Now!
X