News Flash

Viral : भारतात आलेल्या विन डिझेलवर विनोदांचा महापूर

‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन भारतात आलाय

Viral : भारतात आलेल्या विन डिझेलवर विनोदांचा महापूर
वीन मुंबईत पोहचताच दीपिकाने खास मराठमोळ्या पद्धतीने वीनचे स्वागत केले.

‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी हॉलीवूड स्टार विन डिझेल भारतात आलाय. गुरूवारी मुंबईत विनचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच खास मराठमोठ्या पद्धतीने विनचे स्वागत करण्यात आले. विनशी संवाद साधण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. विनच्या भारत दौ-यात कोणतीही कमी निर्माण होता कामा नये यासाठी खुद्द दीपिका पदुकोणने सारी तयारी केली.

आपल्या नव्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलेला विन आणखी एक दोन दिवस भारतात आहे. या चित्रपटात दीपिकाने देखील काम केले आहे. विन मुंबईत पोहचताच दीपिकाने खास मराठमोळ्या पद्धतीने विनचे स्वागत केले. नऊवारी साडी आणि फेटा बांधून विनच्या स्वागतसाठी महिलावर्ग सज्ज होता. त्याच्या मराठमोळ्या स्वागताची बॉलीवूड काय पण हॉलीवूडमध्येही चर्चा झाली. पण या चर्चेपेक्षा सोशल मीडियावर विनवर विनोदच अधिक पाहायला मिळाले. विन भारतात आल्यावर त्याला कशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतील, त्यावर नेते मंडळी काय म्हणतील अशी एकपेक्षा एक सरस विनोदांचा महापूर सोशल मीडियावर आला होता.

विन डिझेल आणि दीपिका पादुकोण यांनी गुरुवारी चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी दीपिका आणि चाहत्यांच्या फर्माईशीवरुन विनने लुंगी बांधून लुंगी डान्सही केला. उद्या भारतात हिंदीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 12:03 pm

Web Title: twitteratis cracking up with jokes on vin diesel
Next Stories
1 ‘#चरखा_चोर_मोदी’ हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये
2 PHOTOS : ‘या’ पाच इमोजींचा होतो जगात सर्वाधिक वापर
3 उषा किरण बनली नक्षलग्रस्त भागातील पहिली महिला CRPF अधिकारी
Just Now!
X