News Flash

Video : वयाच्या १८ व्या वर्षीच NDA ची परीक्षा क्रॅक करणाऱ्या जय सावंतचा कानमंत्र

जय सावंतने वयाच्या १८ व्या वर्षी एनडीएची प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली आहे. एनडीएअंतर्गत घेण्यात येणाऱ्या नौदलाच्या परीक्षेत तो भारतातून २५३ वा आला आहे.

Video Interview of Jai Sawant 18 Year Boy Who cracked UPSC NDA NA II 2020 exam in first attempt
परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला असून तो भारतातून २५३ वा आला आहे.

देशातील तिन्ही सैन्य दलांसाठी सर्वोत्तम अधिकारी घडवणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या नौदल विभागाच्या निकालांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषणा केली. नेव्हल अकादमी परीक्षा (२) २०२० च्या निकालांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये ४७८ जणांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे यापैकी ३२ जण हे महाराष्ट्रातील आहेत. विशेष म्हणजे या ३२ जणांपैकी जय सावंत हा मुलगा अवघ्या १८ वर्षांचा आहे. होय, जय वयाच्या १८ व्या वर्षी एनडीएची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला असून तो भारतातून २५३ वा आला आहे. त्याने हे कसं केलं?, अभ्यासाचं नियोजन त्याने कशापद्धतीने केलं?, अशा परीक्षा देणाऱ्यांना तो काय सांगू इच्छितो हे जाणून घेऊयात जयच्या या खास मुलाखतीमधून…

लोकसत्ता डॉटकॉमचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2021 5:30 pm

Web Title: video interview of jai sawant 18 year boy who cracked upsc nda na ii 2020 exam in first attempt scsg 91
Next Stories
1 करोना लस घेतल्यानंतर तीन मैत्रिणींनी साजरा केला १०० वा वाढदिवस!
2 एक विवाह ऐसा भी! फक्त ५०० रुपयांत लग्न करत महिला अधिकारी आणि लष्कर जवानाने ठेवला समाजासमोर आदर्श!
3 Video : मुंबईच्या वेशीवर ‘लाल चिखल’; Eastern Express Highway वर पडला २० टन टोमॅटोचा खच
Just Now!
X