News Flash

Video: थरारक… बिबट्याने झाडाच्या शेंड्यावरच केली माकडाची शिकार

हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे

Viral Video Leopard Backflip To Capture Monkey

जंगलामध्ये अनेक अद्भूत गोष्टी घडत असतात. येथे जिवंत राहण्यासाठी रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणाऱ्या कसरती आपल्याला आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा होते. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक बिबट्या झाडावर चढून माकडाची शिकार करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्याने झाडाच्या एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर उड्या मारणाऱ्या माकडाला पकडण्यासाठी चक्क बॅक फ्लिप म्हणजेच उलटी उडी मारली आहे.

सुशांत नंदा या आयएफएस अधिकाऱ्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, “शिकार पकडण्यासाठी बिबट्याने भन्नाट बॅक फ्लिप उडी मारली. ही उडी अगदी जगावेगळीच होती. सामान्यपणे झाडावर शिकार करताना बिबटे त्यांची शिकार जमीनीच्या दिशेने खाली खाली घेऊन येतात आणि मग झडप टाकून मानेचा चावा घेत शिकार करतात. मात्र इथे माकडाची शिकार करण्यासाठी बिबट्याने झाडावर असतानाच उडी घेत माकडावर हल्ला केला,” असं म्हटलं आहे.

मात्र ही घटना भारतात घडली नसून हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेमधील आहे असं सुशांत यांनी एका ट्विटला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे. आठ हजारहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 10:49 am

Web Title: viral video leopard backflip to capture monkey scsg 91
Next Stories
1 आफ्रिदीचं कौतुक करताच नेटक-यांनी भज्जी, युवीला घेतलं फैलावर
2 PM CARES फंडासाठी ५०१ रुपयांची मदत करणाऱ्याला पंतप्रधान मोदींचा रिप्लाय, म्हणाले….
3 VIDEO : शिकूया नवं काही… पेन्सिल टॉपिंग कसं बनवाल
Just Now!
X