ओरँगउटान याचा अर्थ ‘अरण्यातील माणूस’ असा आहे. याचे शास्त्रीय नाव पोंगो पिग्मियस असे आहे. हा प्राणी वृक्षवासी आहे, पण कधीकधी जमिनीवरही येतो. वृक्षवासी असल्यामुळे याचे पायापेक्षा हात लांब असतात आणि आकारमान गोरिलाच्या खालोखाल असते. ओरँगउटान हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. त्याची हुशारी दर्शवणारा असाच एक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोकांना हसवत आहे. व्हिडीओमध्ये, एका ओरँगउटानने पर्यटकांकडून चुकून पडलेल्या सनग्लासेसला एकदम स्टाईलिशपणे घातले. हा किस्सा इंडोनेशियातील प्राणिसंग्रहालयातील आहे. पर्यटकाकडून त्यांचे सनग्लासेस पडल्यावर त्यांनी हा व्हिडीओ स्वतः बनवला आहे. या प्राण्याची हुशारी बघून नेटीझन्स त्याची वाह वाह करत आहे.

नक्की काय झालं?

लोलिता टेट्सू नावाच्या एका पर्यटकाने डोक्यावर सनग्लासेस ठेवले होते जेव्हा त्या इंडोनेशियातील बोगोर येथील तामन सफारीला भेट देत होत्या. त्याच वेळी चुकून त्यांचे सनग्लासेस खाली पडले. तेव्हा हे एका बाळ घेऊन जाणाऱ्या ओरँगउटानने पहिले. आणि हळू हळू सनग्लासेस पडलेल्या दिशेने चालू लागला आणि काही क्षणातचं त्याने सनग्लासेस उचलले. टेट्सू यांनी बहुधा “अरे नाही, ते खाऊ नका ” असे म्हणतात. तथापि, असे वाटले की ओरँगउटानला ते नक्की काय आहे हे माहित आहे, म्हणूनच त्याने सनग्लासेस स्टायलिशपणे आपल्या डोळ्यांवर ठेवले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. सनग्लासेस खाण्याऐवजी, फोडण्याऐवजी ओरँगउटानने एखाद्या बॉससारखे घातले आणि अनेक पोझेस देखील केल्या.

 ओरँगउटानने सनग्लासेस दिले परत

ओरँगउटानने सनग्लासेस सोबत मनसोक्त खेळून झाल्यावर, छान पोझेस दिल्यावर ते परतही दिले. एका झाडावर मस्त बसून त्याने ऐटीत ते सनग्लासेस महिलेच्या दिशेने फेकले. त्याच्या बदल्यात ओरँगउटानला कोणीतरी खाण्यासाठीही दिले.

या व्हिडीओला नेटीझन्सनी पसंती दर्शवत ओरँगउटानचे माणसासारखे गुण पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही आत्ता इंटरनेट स्टार आहात.” अशीही कमेंट केली आहे.  तर अनेकांनी हा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यासाठी लोलिता टेट्सू यांचे आभारही मानले आहेत.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?