News Flash

याड लावणारं हे ‘खुळं’ आलं कुठून?

तरुणवर्गात विशेष प्रसिद्ध होत आहे

अनेकांनी गाण्यातील शब्दांकडे काहीसं दुर्लक्ष करत एलियनच्या तालावर नाचण्याचं चॅलेन्ज स्विकारलं आहे.

सोशल मीडियावर कधी, काय आणि कोणता ट्रेंड येईल याचा काही नेम नसतो. सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर सगळीकडेच ‘Dame Tu Cosita’ चॅलेन्ज अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या एलियन्स प्रमाणे नाचून दाखवायचं आणि त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा हे ‘Dame Tu Cosita’ चॅलेन्जचं स्वरुप. आतापर्यंत रोहित शर्मा, जॅकलिन, यामी गौतम, दिव्यांका त्रिपाठी यांनी हे चॅलेन्ज स्विकारलं आहे. या आठवड्यापासून ट्रेंड होत असलेल्या ‘Dame Tu Cosita’ चॅलेन्जमधल्या या विचित्र एलियननं हळूहळू अनेकांना आपल्या तालावर नाचवलं आहे.

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींना याड लावणारं हे ‘खुळं’ आलं कुठून असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर अर्थात सोशल मीडिया हे त्यामागचं कारण आहे. ‘Dame Tu Cosita’ हे गाणं एल चाँबची निर्मिती आहे. हे स्पॅनिश गाणं असून त्याचा द्वैअर्थ निघतो असं अनेकांनी म्हटलं आहे.  अनेकांनी गाण्यातील शब्दांकडे काहीसं दुर्लक्ष करत एलियनच्या तालावर नाचण्याचं चॅलेन्ज स्विकारलं आहे, बघायला सोप्पं पण करायला अवघड असणाऱ्या या डान्स स्टेप्स एकदा तरी करून पाहण्याचा मोह अनेकांना अनावर झाला आहे. त्यामुळे तरुणवर्गात हे चॅलेन्ज विशेष प्रसिद्ध होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 12:00 pm

Web Title: what is dame tu cosita challenge and where it come from
Next Stories
1 बिग बींच्या फोनचं मध्यरात्री अचानक गेलं नेटवर्क, म्हणाले…
2 दिव्यांग पतीला पाठीवर उचलून CMO कार्यालयात पोहोचली महिला, कारण…
3 भंडाऱ्याची वाघीण! बिबट्याशी दिली झुंज
Just Now!
X