24 September 2020

News Flash

मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ‘आधार’ला लिंक असल्याची खात्री अशा पद्धतीने करा

सत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे

( संग्रहित छायाचित्र)

नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘युनिक आयडेंटिफीकेशन नंबर’ अर्थात आधार कार्डमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांचे व्यवहार जास्तीत जास्त सुरळीत व्हावेत, यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. आता आधारकार्ड क्रमांक हा आयकर भरण्यासाठी तसेच पॅनकार्डसाठी नोंदणी करतानाही आवश्यक असतो. आधारकार्डवर आता नागरिकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीही असणार आहे.

आपल्या आधारकार्डावरील मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी ऑनलाईन पद्धतीने पडताळून पाहता येणार आहे. नागरिकांना ‘युनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवरुन या गोष्टी तपासता येणार आहेत. या वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यावर व्हेरिफाय ई-मेल अॅंड मोबाईल नंबर असा पर्याय दिलेला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला आधारकार्ड क्रमांक आणि ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बाजूच्या बॉक्समध्ये असलेला सिक्युरिटी कोड याठिकाणी टाकायचा आहे. जर ही माहिती अपडेट केलेली नसेल तर तुम्हाला ती अपडेट करता येणार आहे.

ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला गेट वन टाईम पासवर्ड (OTP) असे लिहिलेल्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. हा पासवर्ड तुम्हाला मेलवर किंवा मोबाईलवर येईल. हा ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर त्याखाली व्हेरीफाय ओटीपी असा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास तुम्हाला लगेचच तुमचा ईमेल आयडी तुमच्या माहितीशी जुळत आहे, असा मेसेज येईल. अशाचप्रकारे तुमचा मोबाईल क्रमांकही योग्य आहे का नाही ते तुम्हाला तपासून पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 6:02 pm

Web Title: your aadhar card and mobile number email id how to verify
Next Stories
1 .. त्यांच्या देशभक्तीला सलाम, गुडघाभर पाण्यात उभं राहून केलं ध्वजारोहण!
2 राष्ट्रगीताचा इंग्रजी अनुवाद करून मॅथ्यू हेडनकडून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
3 Viral : ‘ती’च्या १३ तासांच्या अथक प्रयत्नांना यश; डिप्रेशनमध्ये असलेल्या मुलीचं रुपडं पालटलं
Just Now!
X