अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Railway Accident Stopped By Old Man: लाइटहाऊस जर्नलिझमला एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत असल्याचे लक्षात आले, या पोस्ट मध्ये एका 53 वर्षीय एका मजुराने ६ किलोमीटरहून धावत जात रेल्वे अधिकाऱ्यांना रुळामध्ये तडा गेली असल्याची माहिती दिली. ज्यामुळे ट्रेनची मोठी दुर्घटना टाळण्यासाठी मदत झाली. ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील हृदय पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या समोर येत असताना देवदूतासारख्या माणसाची ही गोष्ट सुद्धा चांगलीच चर्चेत आहे. पण या संदर्भातील संपूर्ण तपासात एक वेगळेच सत्य समोर आले आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Mr. Tweet ने व्हायरल ट्विट शेअर करत लिहिले होते की, ‘या व्यक्तीने ट्रेनची मोठी दुर्घटना टाळण्यास मदत केली. कृष्णा पुजारी हे एक खरेखुरे हिरो आहेत. #odisha #TrainAccident #coromandel’

अन्य अनेक यूजर्स देखील हि पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आमचा तपास आम्ही साध्या किवर्ड सर्च पासून सुरु केला. आम्ही, ‘Krishna Poojari’ या नावाचा तपास गूगल वर केला. आम्हाला yourstory.com वर एक याच संदर्भात बातमी सापडली ज्याचे शीर्षक होते: ‘कृष्णा पुजारी यांनी भेटा ज्यांनी शारीरिक अपंगत्व असूनही एक मोठा रेल्वे अपघात टाळला’

https://yourstory.com/2018/10/krishna-poojary-train-accident

आर्टिकल मध्ये नमूद केले होते: उजव्या पायात मज्जातंतूचा त्रास असूनही, कृष्णा पुजारी यांनी रेल्वे अधिकार्‍यांना संभाव्य रेल्वे अपघात टाळण्यासाठी मदत करणारी माहिती दिली होती. व त्यासाठी ते तब्बल सहा किमी धावले होते. हे आर्टिकल ऑक्टोबर ३१, २०१८ रोजी प्रकाशित करण्यात आले होते.

आम्हाला या संबंधी अजून काही बातम्या सापडल्या.

https://timesofindia.indiatimes.com/city/mangaluru/karnataka-man-with-limb-ailment-runs-3km-averts-train-tragedy/articleshow/66403478.cms

कर्नाटकातील उडुपी येथे ही घटना घडल्याची माहिती यावरून समजते.

https://www.thehindu.com/news/cities/Mangalore/udipi-man-runs-3-km-to-alert-about-crack-in-track/article25376224.ece

तसेच, काही मीडिया वेबसाईट्सनुसार, रेल्वे रुळावर पडलेल्या दरडीबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी कृष्णा पुजारी ६ किलोमीटर नाही तर ३ किलोमीटर धावले होते.

हे ही वाचा << ओडिशा दुर्घटनेनंतर हॉस्पिटलचा व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप; PM मोदी येणार म्हणून… खरं प्रकरण काय?

निष्कर्ष: कृष्णा पुजारी, ज्यांच्या पायाला आंशिक अपंगत्व होते, त्यांनी अपघात टाळण्यासाठी रेल्वेमध्ये तडा गेली असल्याची माहिती धावत जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली होतो. ही माहिती खरी असली तरी ही कर्नाटकातील उडुपी येथील जुनी घटना आहे. व अलीकडे झालेल्या ओडिशाच्या रेल्वे दुर्घटनेशी त्याचा काही संबंध नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 53 year old handicapped man runs 6 km to prevent odisha railway accident but the real story behind viral post is different svs
First published on: 08-06-2023 at 09:04 IST