सध्याच्या डिजीटल जमान्यात अनेक लोकांचे सोशल मीडीयावर हजारो नवीन मित्र बनतात. मात्र, यापैकी अनेक लोकांना आपण ओळखत नसतो. शिवाय यामधील अनेकजण तर चुकीच्या नावाने आपली सोशल मीडियाची अकाऊंट चालवतं असतात. तसंच फेसबुक इंस्टाग्राम किंवा डेटिंग अॅपद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका ५८ वर्षाच्या व्यक्तीने तब्बल १५५ अविवाहित महिलांना सोशल मीडीयाद्वारे फसवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या व्यक्तीने डेटिंग साइट्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचंही उघड झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिलांशी संवाद साधायचा आणि नंतर त्यांची फसवणूक करायचा. एवढंच नव्हे तर या व्यक्तीने महिलांची फसवणूक करुन त्यांच्याकडून जवळपास ४ कोटी रुपये उकळल्याचंही पोलिस तपासात समोर आलं आहे. या घटनेप्रकरणी आरोपीला सध्या त्याला ५ वर्षांची शिक्षा करण्यात आली आहे. या घटनेची माहिती आजतक या वृत्तवाहिनीने दिली आहे.

हेही पाहा- Video: बहिणीच्या नवऱ्यासोबत मेहुणीने केलेल्या डान्सची नेटकऱ्यांना भूरळ; म्हणाले, ‘आमची नजरच हटेना…’

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील आहे. येथील एका ५८ वर्षीय पॅट्रिक जिब्लिन नावाच्या व्यक्तीला न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. जिब्लिन याने अनेक अविवाहित महिलांना टार्गेट करत त्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. जिब्लिन हा डेटिंग साइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधायचा आणि त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून पैसे मागायचा.

nypost.com च्या अहवालानुसार, अटलांटिक शहरातील पॅट्रिक जिब्लिनला विधवा, अपंग महिला आणि एकल मातांची फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला यापूर्वीही अनेकदा अटक झाली होती. त्यावेळी त्याला 20 लाखांचा दंड करण्यात आला होता. मात्र तो दोन वेळा फरार झाला होता.

हेही पाहा- लेक वणव्यामध्ये गारव्यासारखी! आईला होणारा उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी चिमुरडीची धडपड; डोळ्यात पाणी आणणारा Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी वकिलांनी सांगितलं की जिब्लिनला अनेक वर्षांपासून अशा प्रकारे महिलांची फसवणूक करतो. तो आधी महिलाना भावनिक करतो नंतर लालच दाखवतो आणि शेवटी दबावाचा वापर करून त्यांच्याकडून पैसे उकळतो. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने तब्बल १५५ महिलांची फसवणूक करत त्यांच्याकडून ४ कोटी रुपये उकळले आहेत.