भारतात कौशल्याची काही कमतरता नाही. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यात लोक आपले कौशल्य दाखवतात. प्रत्येक व्हिडीओ एका पेक्षा एक असतो. काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेल असतात तर काही खरचं कौतूक करण्यासारखे असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून लोकांना धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण महामार्गावरून धावताना दिसत आहे. त्याचा धावण्याचा वेग पाहून लोकांना डोळ्यावर विश्वास बसत नाही कारण महामार्गावरून धावणाऱ्या ट्रकपेक्षा वेगात धावताना दिसत आहे.

हेही वाचा – नवरा रोज ब्रश अन् अंघोळ करत नाही म्हणून महिलेने मागितला घटस्फोट! कोर्टाने सुनावला निर्णय

व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे की हा तरुण महामार्गावर धावत आहे. मोठे अवजड वाहनांची महामार्गावरून ये-जा सुरू आहे. दरम्यान रस्त्यावरून धावणारा हा तरूण चक्क एका धावत्या ट्रकसह स्पर्धा करताना दिसत आहे. धावता धावता तो क्षणार्धात ट्रकला मागे टाकतो. काही लोकांनी तरुणाच्या कौशल्याचे कौतूक केले आहे तर काहींनी जीव धोक्यात टाकून रस्त्यावर धावण्यामुळे त्याचावर टिका केली आहे.

हेही वाचा – Video: “खुब भालो!” स्पोर्ट बाईक चालवताना दिसली बंगाली नवरी; Viral Video पाहून नेटकरी झाले फिदा

एकाने कमेंट करत लिहिले की, “कृपया महामार्गावर धावताना काळजी घ्या. ते सुरक्षित नाही.” दुसरा म्हणाला, हे सुरक्षित नाही भाऊ, तुमची क्षमता देशाला हवी आहे. NHवर धावणे टाळा .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर racer_lekhu_1920 नावाच्या अकांउट पोस्ट करण्यात आला आहे. लेखराज साहू असे या तरुणाचे नाव आहे जो एक व्हिडीओ किएटर आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अशाच प्रकारे धावण्याचे अनेक व्हिडीओ दिसत आहे.