scorecardresearch

Premium

लपंडाव खेळताना बहिणीला शोधण्यासाठी भावाने लढवली अनोखी युक्ती, मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहीण भाऊ लपंडाव खेळताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक अनोखी युक्ती वापरुन भाऊ बहिणीला शोधतो.

A brother and sister playing hide and seek game
लपंडाव खेळताना बहिणीला शोधण्यासाठी भावाने लढवली अनोखी युक्ती, मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहीण भाऊ लपंडाव खेळताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक अनोखी युक्ती वापरुन भाऊ बहिणीला शोधतो.

बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा असतो. ते एकमेकांबरोबर खूप भांडतात पण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. असाच एका बहीण भावाचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तु्म्हालाही तुमचे बालपण आठवू शकते.

Waiter carries more than a dozen plates at once over his one hand
VIDEO : “ऐ भाई, ज़रा संभाल के..!” वेटरची ही अनोखी कला पाहून व्हाल अवाक्, व्हिडीओ होतोय व्हायरल
Zomato agent Riding wheelchair modelled like a motorbike
जिद्द असावी तर अशी! व्हिलचेअर बाईकवरून डिलिव्हरी करतोय हा दिव्यांग व्यक्ती; झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा फोटो व्हायरल
a man fell with a child in a moving train
बापरे! चालत्या ट्रेनमधून चिमुकल्याला घेऊन खाली पडला, धावत आले लोकं; व्हिडीओ होतोय व्हायरल
an old man kombda dance funny video viral
कोंबडा डान्स व्हायरल! आजोबांनी केलेल्या अतरंगी डान्सची सगळीकडे चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच…

हेही वाचा : आजी नातवाचं प्रेम! नातवाला पोळी कशी लाटायची शिकवतेय आजी,व्हिडीओ पाहून आठवेल तुमचे बालपण

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बहीण भाऊ लपंडाव खेळताना दिसत आहे. भावावर डाव असतो तेव्हा चिमुकली बहिण लपताना दिसते. व्हिडीओत पुढे दिसते की भाऊ बहिणीला शोधताना दिसतो पण जेव्हा शोधून सुद्धा बहीण सापडत नाही तेव्हा भाऊ अनोखी युक्ती लढवतो. तो अचानक लोकप्रिय कवितेची पहिली ओळ ‘जॉनी जॉनी’ म्हणतो तेव्हा लपलेली बहीण अचानक ‘येस पापा’ म्हणते आणि त्याला बहिण कुठे लपलेली आहे, हे समजते. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही हसू आवरणार नाही.

royal_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून लय हसलो” तर एका युजरने लिहिलेय, “बिचारी चिमुकली” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही चिटींग आहे”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A brother and sister playing hide and seek game watch how cleverly he find out his sister video viral on social media ndj

First published on: 29-11-2023 at 09:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×