Viral Video: पावसाळा ऋतू सुरू झाला की थंडगार हवा, जोरदार पडणाऱ्या पावसात भिजण्याची इच्छा सर्वांनाच होते. पण, या पावसाळा ऋतूत आरोग्याला जपणही तितकेचं महत्वाचे असते. माणसांबरोबर जनावरांना होणारे आजारही सर्वत्र पसरतात. त्यामुळे देशातील बदलते हवामान व प्राण्यांचे आरोग्य यांचे महत्वही समजून घेणे महत्वाचे आहे. ऋतुमानानुसार प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असतो. पण, प्राण्यांच काय? तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत जोरदार पाऊस पडत असल्याने एका बैलाने कॅफेचा आश्रय घेतला आहे. पण, नक्की पुढे काय घडलं आहे सविस्तर जाणून घेऊ.

व्हायरल व्हिडीओ उत्तराखंडमधील आहे. उत्तराखंडमधील नौकुचियातालमध्ये २ जुलै रोजी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस इतका मुसळधार होता की रस्त्यावरून जाणाऱ्या एका बैलाने कॅफेचा आश्रय घेण्याचे ठरवले. बैल कॅफेत शिरून प्रवेशद्वारावर उभा राहिला. त्यानंतर प्रवेशद्वारावर उभ्या राहणाऱ्या बैलाला महिला कॅफे व्यवस्थापक हाकलून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण, नेमकं पुढे काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…तिकीट नसलेल्या प्रवाशांना ‘त्याने’ शिकवला धडा; असा शोधला मार्ग की… नेटकरी म्हणू लागले त्याला ‘हीरो’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, कॅफेच्या प्रवेशद्वारावर बैल उभा आहे. दोन ग्राहक बैल बाहेर जाण्याची वाट पाहत आहेत. जसा व्हिडीओ पुढे जातो तेव्हा कॅफे व्यवस्थापक छत्री घेऊन बैलाला हाकलून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र बैलाने तितक्यात महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बैलाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र या व्हिडीओने भटक्या गुरांच्या अश्रायबद्दल आणि नागरिकांना या प्राण्यांचा धोका आहे ही गोष्ट मात्र नक्की अधोरेखित केली आहे.

सोशल मीडियावर @Benarasiyaa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. राज्यात २७ जून रोजी मान्सूनला सुरुवात झाली त्यानंतर भारतीय हवामान विभागाने (IMD) ४ जुलैपर्यंत राज्यभर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. शनिवारी दुपारी उत्तराखंडच्या हरिद्वारला मुसळधार पावसाने हजेरी लावली असून. सुकी नदीला पूर आला आणि अनेक वाहने वाहून गेली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशातच या व्हिडीओनेही नागरिकांचेही लक्ष वेधून घेतलं आहे आणि अनेक जण प्राण्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा उपाय सुचवताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.