रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्याने भारतीयांना लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेगाड्यांतूनच करणे सोईस्कर वाटते. त्यामुळे अनेक जण तिकीट कन्फर्म होण्याची वाट पाहत असतात. पण जेव्हा गाड्यांची कमतरता आणि ट्रेन फुल असतात तेव्हा प्रवाशांच्या हाती भलीमोठी वेटिंगची लिस्ट पडते. मग नाइलाजाने हे वेटिंग तिकीट असतानाही प्रवासी ट्रेनमधून प्रवास करीत असतात. रेल्वेकडून विविध मार्गांवर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जात असते. तरीही काही विनातिकीट प्रवासी सर्रास प्रवास करताना दिसतात. विनातिकीट प्रवासी, गाड्यांची गर्दी आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दलची व्यथा मांडणाऱ्या भारतीय रेल्वे प्रवाशांची रोज एक नवीन गोष्ट समोर येते. पण यावेळी, एका प्रवाशाने तिकीट नसलेल्या प्रवाशांना थेट ट्रेनच्या बाहेरचा मार्ग दाखवला आणि जागरूक नागरिक होण्याचा हक्क बजावला आहे. नक्की काय घडलं याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

एक प्रवासी @yodebu हावडा ते खरगपूर असा मुंबई मेलने (१२८१०) स्लीपर कोचमधून प्रवास करीत होता. तेव्हा त्याला विनातिकीट प्रवाशांचा सामना करावा लागला. प्रवाशाकडे स्वतःचे आरक्षित स्लीपर तिकीट होते आणि तो रेल्वेमध्ये चढला. प्रवासी त्याच्या सीटवर निवांत बसला होता. नंतर तेथे एक कुटुंब आले. एकाने सीटवर येऊन चार्जर लावला. तेव्हा त्या आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशाने त्यांना जागेवर बसू नका, असे सांगितले त्यानंतर त्यांचे तिकीट विचारले. त्यावर त्या कुटुंबाकडे कन्फर्म मेल तिकीट नव्हते. हे ऐकताच ट्रेन सुटण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबाला त्याने खाली उतरवले. नंतर पुढे एक जोडपे आले. त्यांनाही त्या प्रवाशाने हाकलवून लावले. नक्की काय लिहिले आहे ते या पोस्टमध्ये तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा…

हेही वाचा…कमाल! पठ्ठ्याने एका मिनिटात फोडले चक्क ‘एवढे’ अक्रोड; VIDEO पाहून व्हाल थक्क; गिनीज रेकॉर्ड्सनेही घेतली दखल

पोस्ट नक्की बघा…

Yesterday I single handedly de boarded about 50 ticketless passengers
byu/yodebu inindianrailways

प्रवासी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यांनी या घटनेची माहिती ‘रेल मदत’ला (Rail Madad) पाठवली. नंतर खरगपूर स्थानकावर उतरण्यापूर्वी खरगपूर टीटीई डब्यात आले आणि त्यांनी तिकीट नसलेल्या प्रवाशांना उतरवले आणि त्यांना मोठा दंड ठोठावला. त्या जोडप्यालादेखील दंड ठोठावण्यात आला, अशा छोट्या गोष्टी करण्याचा हा एक चांगला दिवस होता, असे सांगत त्याने पोस्टचा शेवट केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट Reddit @yodebu ॲपवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका युजरने कमेंट केली आहे, “अशा प्रसांगातून स्वतः मार्ग काढणे आणि स्वतःची जागा वाचवणे हे खूपच चांगलं आहे.” तर दुसऱ्याने कमेंट केली आहे, “तुमच्यात खरोखर खूप हिंमत आहे. हॅट्स ऑफ.” तसेच तिसरा युजर म्हणतोय, “प्रत्येक स्लीपर कोचमध्ये तुझ्यासारखा हीरो असणे महत्त्वाचे आहे.” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसून आले आहेत.