सध्या सोशल मीडियावर अनेक गोंडस प्राण्याचे तर कधी लहान मुलांचे मनाला भावनारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. शिवाय नेटकरी त्यांच्या आवडीचे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह नेटकऱ्यांना आवरता येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी ट्रेनमधून प्रवास करताना आपल्या पाळीव कुत्र्यालाही सोबत घेऊन जाताना दिसत आहे. जे पाहून अनेकांनी त्या महिलेचं कौतुक केलं आहे.
महत्वाची बाब म्हणजे हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तो शेअर करण्याचा मोह खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनादेखील आवरता आला नाही. रेल्वे मंत्र्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. शिवाय त्यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये भारतीय रेल्वे चोवीस तास तुमच्या सेवेत असल्याचं लिहिलं आहे.
अनेकांना रेल्वेचा प्रवास म्हटलं की डोळ्यासमोर येते ती लोकांची गर्दी आणि गाड्यांची अत्यंत वाईट अवस्था. मात्र, सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मुलगी आपल्या पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. शिवाय यावेळी ट्रेनचा डबा अतिशय स्वच्छ आणि चकचकीत दिसत आहे. तर हा कुत्रा ट्रेनमध्ये मुलीसोबत लहान मुलासारखा प्रवास करतानाचा व्हिडीओ अनेकांना भावला आहे.
हा व्हिडिओ सर्वप्रथम इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर तो सिद्धार्थ बकारियाने नावात्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला होता. जो नंतर रेल्वे मंत्र्यांनीही शेअर केला. या व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनमध्ये तिच्या सीटवर ब्लँकेट पांघरुन झोपलेली दिसत आहे, तिच्या शेजारी आणखी कोणीतरी झोपलेलं दिसत आहे. त्यानंतर एक व्यक्ती मुलीजवळ येते आणि तिच्या अंगावरील ब्लँकेट बाजूला काढते, तेव्हा लॅब्राडोर जातीचा एक कुत्रा मुलीजवळ झोपल्याचं दिसत आहे. शिवाय तो कुत्रा निरागसपणे कॅमेराकडे पाहताना दिसत आहे. हे मनाला भावनारे दृश्य पाहिल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही प्रभावित झाले आणि त्यांनी हा व्हिडीओही शेअर केला. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.