मरिन ड्राइव्ह… हे दोन शब्द पुरेसे आहेत एखाद्या मुंबईकराच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. पावसाळ्यात मरिन ड्राइव्हच्या कठड्याला धडकणाऱ्या काही फुटांच्या लाटा असो किंवा वानखेडेवर भारताने मिळवलेला विश्वचषक सर्वच गोष्टींचा हा जगप्रसिद्ध कट्टा साक्षीदार आहे. बरं अनेकांसाठी हा हक्काचा कट्टा आहे. म्हणजे अगदी कॉलेज बंक मारण्यापासून ते मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांपर्यंत आणि ऑफिसला जाणाऱ्यांपासून ते फक्त मरिन ड्राइव्ह बघायला आलेल्यांपर्यंत अनेकजण एकाचवेळी येथे सापडतात.असाच एक मरिन ड्राइव्हवरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डुप्लिकेट मायकल जॅक्सनला तरुणीने प्रपोज केला आहे. या तरुणीने गुलाबाचं फुल देऊन गुढग्यावर खाली बसून प्रपोज केलं आहे. यावेळी आजूबाजूला असेलेले लोकही चक्रावले आहेत. या तरुणाला कुणी मायकल जॅक्सनचा डुप्लिकेट म्हणत आहे तर कुणी गोल्डन बॉय म्हणत आहे. आजकाल मोठ्या प्रमाणात तरुणाई मरिन ड्राइव्हवर दिसत असते. यावेळी काहीजण रिलसाठी, काहीजण सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काही ना काही करत असतात. त्यामुळे अशाच प्रकारचा हा स्टंट वाटत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – प्रेमासाठी कायपण! LIVE बातम्या सांगताना अँकरला बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; रोमँटिक VIDEO VIRAL

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विचित्र रील्स आणि व्हिडीओ बनवण्यात येतात. काही व्हिडीओ इतके अश्लील असतात ही सोशल मीडियावर उघडल्यावर ते डोळ्यासमोर आल्यास तिस्कार येतो. काही तरुण तरुणी मर्यादा ओलांडत भयानक आणि आक्षेपार्ह कृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. प्रसिद्धी आणि फोलावर्स वाढविण्यासाठी अशाप्रकारे व्हिडीओ बनवले जातात.