Viral Video : सोशल मीडियावर पाळीव आणि जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पिंजऱ्यात असलेल्या सिंहाने असे काही केले की तुमचा विश्वास बसणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्राण्यांपासून माणसांपर्यंत सर्वच सिंहाला घाबरतात. सिंह जरी नाव तोंडातून बाहेर पडले तरी घाम फुटतो. सध्या या व्हायरल व्हिडीओमध्ये पिंजऱ्यात सिंहाने पर्यटकाबरोबर असे काही केले की पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एक पर्यटक महिला सिंहाला पाहण्यासाठी पिंजऱ्याजवळ जाते. तितक्यात सिंह तिच्यासमोर येतो आणि तिला बिलगून मिठी मारतो. सिंह इतक्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने मिठी मारताना दिसत आहे की महिलेला घट्ट धरुन ठेवतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही आश्चर्यचकीत होईल.
हेही वाचा : तरुणींना लाजवेल असा आजीचा उत्साह, आजीने केला पंजाबी डान्स; व्हिडीओ पाहा
lion.stigram या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “म्हणून तो राजा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस” आणखी एका युजरने लिहिलेय, “माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम केलेलं कधीही चांगले”