Desi Jugaad Video : भारतात जुगाडू लोकांची कमी नाही, काही लोक असले काही जुगाड शोधून काढतात जे पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. जेव्हा कुठली गोष्ट विकत घेणे परवडणारे नसते तेव्हा लोक जुगाड करुन सेम तशीच गोष्ट बनवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जुगाड करणे भारतीयांच्या रक्तातच आहे आणि याबाबतीत आपला कोणी हात धरु शकत नाही. असाच एक जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हीही खूप आश्चर्यचकित व्हाल. यात एका पठ्ठ्याने जुगाड करत कॅनपासून चक्क एक इलेक्ट्रिक सॉकेट बोर्ड बनवला आहे.

कॅनचा वापर आपण पाणी किंवा काही लिक्विडयुक्त पदार्थ भरुन ठेवण्यासाठी करतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने कॅनचा केलेला वापर पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्यक्तीने आपल्या सुपीक मेंदूचा वापर करत कॅनला चक्क सॉकेट बोर्डचे स्वरुप दिले आहे. देसी जुगाड करुन बनवलेला हा सॉकेट बोर्ड आता चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता की, एका कॅनमध्ये अनेक स्विच आणि प्लग सेट केले आहेत. तुम्ही कॅनच्या वरच्या बाजूला म्हणजे झाकणाजवळ पाहिले तर दिसेल की या व्यक्तीने तिथून वायर कनेक्ट करत कॅनच्या आत करंट पाठवला आहे. त्यामुळे सॉकेट बोर्ड नीट काम करतोय. पेटलेल्या रेड लाईटवरूनही हा बोर्ड नीट सुरु असल्याचे समजतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भन्नाट देसी जुगाडचा ही पोस्ट @theindiansarcasm नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, व्वा, काय सीन आहे… ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी त्यावर भन्नाट, मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, हा जुगाड कोणासाठीही उपलब्ध होणार नाही. त्यावर आणखी एकाने मिश्किल कमेंट केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, त्यात आता पाणी भरा. हा देसी जुगाड अनेकांना फारच आवडला आहे, ज्यामुळे असा अनोखा सॉकेट बोर्ड तयार करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक होत आहे.