Viral Video : आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण घरबसल्या पैसे कमवत आहेत. काही जण युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक प्लॅटफॉर्मचा वापर त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी करत आहेत आणि नावासोबत पैसेसुद्धा कमवताना दिसून येत आहेत. व्यापारी असो किंवा एखादा कलाकार, प्रत्येक जण आपल्या कौशल्याचा वापर करून नवनवीन व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येतात; तर अशातच काही जण असेही असतात, जे परिस्थितीमुळे आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहचवू शकत नाहीत किंवा सोशल मीडियाची मदत घेऊ शकत नाहीत, तर आज सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो बघून तुम्ही काही क्षणासाठी भावुक व्हाल…
सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. लहान मुलगा फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातात सिमेंटची प्लास्टिकची पिशवीही आहे. हा मुलगा लाकडी पलंगावर बसून गाणं गाताना दिसत आहे. ‘आईशिवाय मुलांचे आयुष्य कसे अपूर्ण असते’ या नाजूक विषयावर लहान मुलाने हे गाणं सादर केलं आहे. लहान मुलाला गाणं गाताना पाहून तुम्हीसुद्धा भावुक व्हाल आणि तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल. लहान मुलाने सादर केलेलं हे गाणं एकदा तुम्हीसुद्धा ऐका…
हेही वाचा…मुंबई रेल्वेस्थानकावर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून प्रवाशांना हसू आवरेना…
व्हिडीओ नक्की बघा :
‘आईशिवाय मुलांचे आयुष्य अपूर्ण’; चमुकल्याने गायलं भावुक गाणं :
आईशिवाय प्रत्येक मुलाचे जीवन अपूर्ण आहे. आई प्रत्येक संकटाच्या काळात मुलांच्या पाठीशी ठामपणे उभी असते. वेळोवेळी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते. तिची प्रत्येक दुःखं बाजूला ठेवून फक्त तुमच्या सुखाचा विचार करते आणि म्हणूनच आईशिवाय आपल्या सगळ्यांचे जीवन अपूर्ण आहे आणि यालाच अनुसरून या मुलाने हिंदी भाषेत सुंदर गाणं गायलं आहे; जे अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
लहान मुलाचा हा व्हिडीओ ट्विटरवर खूप शेअर केला जात आहे.@chaprajhila या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून अनेकजण लहान मुलाच्या गाण्याच्या शैलीचे आणि आवाजाचे कौतुक करत आहेत. तसेच मुलाला मदत करण्याचे आवाहनही कमेंटमधून करत आहेत. व्हिडीओतील गाणं ऐकून काही जणांच्या अंगावर काटा आला आहे. तसेच हा मुलगा कोण आहे?, ‘सरकारने या मुलावर लक्ष द्यावं’, ‘या मुलाचं गाणं स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करा’ अशी अनोखी मागणी करताना अनेक जण कमेंटमध्ये दिसून आले आहेत. हा व्हिडीओ पाहून लहान मुलाचं गाणं नकळत तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल एवढं नक्की.