Lok Sabha Polls 2024: सध्या सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर लोकसभेच्या निवडणुकी संदर्भातील अनेक गोष्टी व्हायरल होत आहे. सध्या अशीच एक लग्नपत्रिका चर्चेत आली आहे. तुम्हाला वाटेल लग्न पत्रिका आणि निवडणुकीचा काय संबंध? त्यासाठी तुम्हाला हा व्हायरल फोटो पाहावा लागेल. हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल लग्नपत्रिका

हा फोटो पाहिल्यानंतर सुरूवातीला तुम्हालाही वाटेल की ही लग्नाची पत्रिका आहे पण जेव्हा तुम्ही नीट वाचाल तर तुम्हाला कळेल की ही लग्नाची पत्रिका नाही तर या हटके पत्रिकाद्वारे मतदान करण्यासाठी विनंती केली आहे. ही व्हायरल पत्रिका पुण्याची आहे.
या पत्रिकावर सुरुवातीला लिहिलेय, “मी प्रथमत: व अंतिमत: भारतीय” त्यानंतर त्या खाली लिहिलेय, “आग्रहाचे निमंत्रण” लग्न पत्रिकेमध्ये वधु वराविषयी माहिती दिली जाते.या पत्रिकेमध्ये मतदार आणि लोकशाहीविषयी माहिती दिली आहे. चि. मतदारला ‘भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव’म्हटले आहे तर चि. सौ. का. लोकशाहीला ‘भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या’ लिहिलेय.

हेही वाचा : “मुंबईपेक्षा हैदराबाद चांगले!” तरुणीने केला दावा, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर…

त्यानंतर त्याखाली लिहिलेय, ” वैशाख शु. १२ सोमवार १३ मे २०२४ रोजी, सकाळी ०७ ते सायं. ०५ या शुभमुहूर्तावर लोकसभा २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदान रुपी आशिर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा हेची निमंत्रण अगत्याचे…!”
पुढे लिहिलेय, “आपले विनित – आम्ही भारताचे लोक वरील विनंतीस मान देऊन मतदान करायला यायचं हं…
आमच्या शिवाय तर मज्जाच नाही.. कु. निळीशाई, चिं ई. व्ही.एम
स्थळ – आपले मतदान केंद्र”
खाली टिप लिहिलीय, “आपले मतदान हाच आमचा आहेर अन् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा फोटो

Pune: Unique Wedding Card Encourages Citizens To Exercise Voting Rights
byu/sixty9e inunitedstatesofindia

r/unitedstatesofindia या रेडिट अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लोकशाही ही नवरदेवाला फसवत आहे”