सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. शिवाय स्त्रीया कुठे आणि कशावरुन भांडतील हे सांगता येत नाही, असंही नेटकरी म्हणत आहेत. त्याचं कारण म्हणजे सध्या बंगंळुरुमधील एका साडीच्या शोरुमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिला एकमेकींशी भांडताना दिसत आहेत.
खरं तर महिलांमध्ये साड्यांची खूप क्रेझ असते, त्यांना सतत नवीन साड्या खरदी करण्याची आवड असते. शिवाय महिलांनी साड्या खरेदीसाठी केलेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या साडी खरेदी करणाऱ्या महिलांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये साडीच्या शोरुममध्ये साड्यांचा सेल लागला आहे, या सेलमधील साड्या घेण्यासाठी महिलांनी खूप गर्दी केली आहे. पण या साडी खरेदीदरम्यान दोन महिलांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही पाहा- Viral Video: “हे कसलं प्रेम?” चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवताच गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला
व्हायरल व्हिडीओत साडीच्या शोरुममध्ये साड्या खरेदी करणाऱ्या दोन महिलांमध्ये काही वाद झाल्याचं दिसत आहे. शिवाय या वादानंतर क्षणात त्या एकमेकींना मारहाण हातामधील साडी ओढताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघींनाही एकच साडी आवडली होती आणि त्यावरुनच हा वाद झाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ बंगळुरूचा असल्याचा दावा तो शेअर करणाऱ्या ट्विटर वापरकर्त्याने केला आहे. @rvaidya2000 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हा व्हिडिओ मजेशीर असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यांनी म्हटलं आहे, “ओ स्त्री है साडी के लिये कुछ भी कर सकती है.” तर आणखी एकाने या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा महिलांचं साडीवरील प्रेम दिसून आल्याचं म्हटलं आहे.