सध्या सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही अंगावर शहारा आणणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विमानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. कारण एका विमानाने उड्डाण करताच त्याच्या इंजिनला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील ओहायो येथील विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या एका विमानाला पक्ष्याने धडक दिल्याने विमानाच्या इंजिनला आग लागली. सुदैवाने हे विमान जमिनीवर सुखरूप उतरवण्यात आल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट १९५८ ने कोलंबसमधील जॉन ग्लेन कोलंबस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी पावणे नऊ वाजता उड्डाण केले होते ते फिनिक्सकडे निघाले होते.

हेही पाहा- दारुच्या नशेत प्रवाशानं चक्क पुरुष कर्मचाऱ्यालाच केलं किस अन् म्हणाला, “तू खूप…”

उड्डाणानंतर लगेचच या विमानाला एका पक्ष्याने धडक दिल्यामुळे आग लागल्यामुळे हे विमानाचे बोईंग ७३७ विमानतळावर आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. विमानाचे लॅंडिंग करताच अग्निशमन दलाने लगेच या विमानाची आग विझवली. या विमानात किती प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, विमानाची दुरुस्ती करण्यात येणार असून, तूर्तास त्याची सेवा बंद करण्यात आल्याची माहीतीही देण्यात आली आहे.

हेही पाहा- अर्शदीपने स्टंप्स तोडताच पंजाब किंग्जची मुंबई पोलिसांकडे तक्रार; पोलिसांनी दिलेला जबरदस्त रिप्लाय होतोय Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या विमानाला आग लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत विमान हवेत असताना त्यातून आगीचे लोट येत असल्याचं दिसत आहे. विमानाला आग लागल्याची दृश्य खूप भयंकर आहेत. तर विमानातील सर्व प्रवाशांना प्रवाशांना इतर विमानांमध्ये हलवण्यात आलं आहे. विमान अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीमुळे काही फ्लाइट ऑपरेशनमध्ये विलंब झाला. शिवाय संपुर्ण प्रकरणाची चौकशी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन करेल.