सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांशी किंवा प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ असो, किंवा इतर व्हिडीओ असो. तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. कधी एखादा मजेशीर व्हिडिओ तुम्हाला हसवतात, तर कधी काही व्हिडीओ लोकांना भावूकही करतात. त्याच वेळी, काही व्हिडीओ खूप आश्चर्यचकित देखील करतात. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो माणसांसोबतच प्राण्यांशीही संबंधित आहे, ज्यामध्ये आईचं प्रेमही पाहायला मिळत आहे. वास्तविक, या व्हिडीओमध्ये एक महिला दोन लहान कुत्र्यांना म्हशीचे दूध पाजताना दिसत आहे आणि कुत्रेही मोठ्या आनंदाने दूध पिताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

( हे ही वाचा: ‘औषधाच्या पॅकेटवर’ छापलेले लग्नाचे आमंत्रण तुम्ही कधी पाहिलंय का? नसेल तर एकदा पहाच)

खरं तर ही महिला आईचे कर्तव्य बजावताना दिसत आहे. ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलांना भूक लागल्यावर दूध पाजते, त्याचप्रमाणे या व्हिडीओमध्ये एक महिला भुकेल्या कुत्र्यांना म्हशीचे दूध पाजताना दिसत आहे. हे एक अद्भुत दृश्य आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती महिला दोन लहान कुत्र्यांना म्हशीचे दूध कसे पाजत आहे. यादरम्यान ती खूप आनंदी दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या हृदयाला भिडला असून काही जण तो पाहून खूप भावूक देखील झाले आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून नक्कीच भावूक व्हाल.

येथे पाहा दूध पाजतानाचा व्हिडीओ

( हे ही वाचा: शांत ज्वालामुखीमध्ये दगड फेकून माणसाने केली चूक; त्यानंतर झालेल्या उद्रेकाचा पहा हा भीतीदायक व्हिडीओ)

( हे ही वाचा: हा पक्षी निघाला कृष्णाचा भक्त! करतोय ‘हरे कृष्ण’चा जप पहा हा VIRAL VIDEO)

हा आश्चर्यकारक आणि हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ @MahantYogiG या आयडी नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यात कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जेव्हा भूक लागते तेव्हा आईच आठवते….’ १८ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत २० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman fed buffalo milk to hungry dogs this touching video won the hearts of people gps
First published on: 23-08-2022 at 13:00 IST