Pune Viral Video : सध्या सगळीकडे उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. देशातील तापमानात वाढ होत असताना महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात वाढ झाल्यानं उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी लोक घराबाहेर पडणे टाळत आहे. अशात उन्हाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्यावी आणि उन्हापासून कसे संरक्षण करावे, यासाठी काही टिप्स सांगणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एका तरुणाने उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी भन्नाट जुगाड सांगितला आहे. पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणमंडळींसाठी हा जुगाड खूप फायदेशीर आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पुण्यातील कडक उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाने शोधला बेस्ट जुगाड (Best Jugaad Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. तो उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी एक भन्नाट जुगाड सांगत आहे. या जुगाडच्या मदतीने तुम्ही तुमचे घर एसी, कुलरविना थंड ठेवू शकता. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण सांगतो, “मुलांनो, जर तुम्ही पुण्यात राहात असाल आणि तुम्हाला कुलर एसी खरेदी करायची नसेल आणि तुम्ही पीजीमध्ये राहात असाल तर तुम्ही हा जुगाड करू शकता. तुम्ही असा पडदासारखी चादर लावा आणि बसून त्यावर पाणी शिंपडा आणि तुमची रूम थंड होणार. राजस्थानीज जुगाड.” हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. गेल्या पाच दिवसात हा व्हिडीओ तीन लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

spambyakshat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “उन्हापासून वाचण्याचा जुगाड” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ओह माय गॉड मी सुद्धा हा जुगाड केला आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हा जुगाड खूप जुना आहे, आम्ही लहानपणी करायचो” आणखी एका युजरने लिहिलेय, “आतापर्यंतचा सर्वात बेस्ट जुगाड’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.