‘अॅनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यातील दारूचा ग्लास डोक्यावर ठेवून नाचण्याची त्याची हूक स्टेप खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अनेकांनी बॉली देओलसारखा डोक्यावर ग्लास ठेवून ‘जमाल कुडू’वर रील्स बनवल्या, त्याही खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. आता एका आजींनाही या ट्रेंडची भुरळ पडली आहे. आजींनी भररेस्टॉरंटमध्ये डोक्यावर बिअरची बाटली ठेवून ‘जमाल कुडू’ गाण्यातील बॉबी देओलची हूक स्टेप करून दाखवली. ती स्टेप पाहिल्यानंतर अनेकांनी “आजी रॉक, बॉबी देओल शॉक” अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. आजींचा हा रॉकिंग डान्स बॉबी देओललाही टक्कर देणारा होता. त्यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

भररेस्टॉरंटमध्ये आजी अगदी बिनधास्तपणे नाचताना दिसतायत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका क्लासी रेस्टॉरंटमध्ये साडी नेसलेल्या एक आजी डोक्यावर चक्क बिअरची बाटली ठेवून एका गाण्यावर दिलखुलास नाचताना दिसतायत. इतकेच नाही, तर नंतर मोठमोठ्याने शिट्ट्या वाजवीत नाचू लागतात. संपूर्ण व्हिडीओत आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतोय. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नजर फक्त आजींवर खिळलेली होती. यावेळी एक तरुणही आजींना नाचताना साथ देताना दिसतोय. आजींनी केलेला भन्नाट डान्स पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर आपसूकच हसू आले असेल.

‘जब हेल मेट सेफ्टी’ व्हायरल होतेय मुंबई पोलिसांची पोस्ट; PHOTO पाहून युजर म्हणाला, “जरा रस्त्यावरील खड्डे…”

View this post on Instagram

A post shared by Siddhesh Bobadi (@sidbobadi21)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजींचा हा रॉकिंग डान्स व्हिडीओ @sidbobadi21नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना अकाउंट युजरने गमतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, आई आजी विथ किंगफिशर. अनेकांनी या व्हिडीओवर खूपच भारी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, आजी रॉक, बॉबी देओल शॉक! दुसऱ्या युजरने लिहिले, आजींच्या एनर्जीला तोड नाही. तिसऱ्या युजरने लिहिले, अशा सासूबाई मला भेटल्या पाहिजेत. आणखी एका युजरने लिहिले की, ऑलिम्पिकमध्ये असा कोणता गेम असता, तर आजी चॅम्पियन असत्या.