सध्याचे तरुण प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये वाद वाढू लागले, एकमेकांच्या गोष्टी पटेनाशा झाल्या किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे ते ‘ब्रेकअप’ करून मोकळे होतात. ब्रेकअपदरम्यान किंवा नंतर वेगळे झालेल्या जोडप्यांमध्ये वरचेवर भांडणे होतात. एकमेकांचा बदला घेण्यासाठी, आपल्या ‘एक्स’ला त्रास देण्यासाठी अनेक जण काही ना काही करामती करत असल्याचे किती तरी किस्से तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील.

मात्र, ब्रेकअपनंतर जोडीदाराला त्रास देण्यासाठी त्यांच्या घरातील टॉयलेट चोरून नेल्याचा किस्सा कधी ऐकला आहे का? रेड्डीट [Reddit] सोशल मीडिया माध्यमावरून एक पोस्ट शेअर झाली आहे, जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये बाथरूम आणि ड्रेनेजचा एक फोटो जोडलेला असून त्याखाली एक कॅप्शन लिहिले आहे, “काल मी माझ्या प्रियकराबरोबर ब्रेकअप केला. तो रात्री जेव्हा घरातून निघून जाण्याची तयारी करत होता, तेव्हा मला झोप लागली. पण, जाग आल्यानंतर समजले की त्याने त्याचे सामान बांधताना माझे टॉयलेटदेखील चोरून नेले आहे”, असे फोटोला कॅप्शन लिहिले आहे.

हेही वाचा : AI Animal Talk : AI सांगणार प्राण्यांच्या मनात काय चाललंय?, त्यामुळे डॉक्टरांना कशी होईल मदत? जाणून घ्या…

मात्र, कुणाच्याही घरचे टॉयलेट इतक्या सहजपणे कसे चोरून नेऊ शकतो? असा प्रश्न उभा राहतो. तर पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणीचा बॉयफ्रेंड हा प्लम्बर होता, त्यामुळे त्याला ते सहज शक्य झाले. ब्रेकअप झाल्यानंतर जोडीदाराने केलेल्या या पराक्रमावर हसू की रडू, हे त्या तरुणीला कळत नव्हते, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.

या ब्रेकअपच्या मजेशीर आणि विचित्र किश्श्यावर तसेच फोटोवर नेटकऱ्यांनी मात्र पोट धरून हसायला लावणाऱ्या कमेंट्स केलेल्या पाहायला मिळतात. त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत पाहू.

“हे खूपच विनोदी आहे! तुमचा ब्रेकअप झाला आणि टॉयलेटदेखील गेले हे खूपच वाईट झाले… पण हा किस्सा खूपच मजेशीर आहे! पण, त्याने त्याचे काम खूपच चांगले केलेले दिसते”, असे एकाने लिहिले आहे.
“चला निदान आता तरी तुला ती अर्धवट राहिलेली भिंत पूर्णपणे रंगवता येईल”, असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“त्यानेच विकत घेतलं होतं ना ते टॉयलेट?” असे तिसऱ्याने लिहिले आहे.
“आता ती जागा मोकळी झालीच आहे, तर त्या फरश्यांची दुरुस्ती करून घे बाई”, असा सल्ला चौथ्याने दिला आहे.
शेवटी पाचव्याने, “ते सगळं ठीक आहे, पण आधी ते उघडे ड्रेनेज बंद करून घे; त्यामधून येणारे गॅस घातक असतात”, असा सल्ला दिलेला आहे.

हेही वाचा : Video : वाह! भीक मागण्याची ‘आधुनिक’ पद्धत पाहून व्हाल चकित! पाहा अंध भिकाऱ्याचा ‘हा’ जुगाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
I split up with my boyfriend yesterday. I fell asleep while he was packing and he stole my toilet.
byu/shelblikadoo inWTF

रेड्डीटवरील shelblikadoo नावाच्या अकाउंटने ही पोस्ट शेअर केली आहे. आत्तापार्यंत या पोस्टला ९४K लाईक्स मिळाले आहेत.