Kokani pati viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. तुम्हीही आतापर्यंत अनेक पुणेरी पाट्या वाचल्या असतील पण कधी कोकणी पाटी वाचलीय का? नाही ना.. मग ही कोकणी पाटी वाचा. कोकणात लावलेल्या या पाटीची सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही कोकणी पाटी वाचून तुम्ही पुणेरी पाटीही विसरून जाल.

या कोकणी पाटीवर कोकणकरांनी घराबाहेर, परिसरात कचरा टाकणाऱ्यांना थेट धमकी दिली आहे. ही पाटी पाहून तुम्ही मुळीच बोलणार नाही की कोकणची माणसं साधी भोळी. उलट तुम्हीही ही पाटी पाहून शॉक व्हाल.

काय लिहलंय पाटीवर?

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पाटीवर. तर या पाटीवर एकच पाटी कोकणची असं सुरुवातीला ठळक अक्षरात लिहलं आहे. त्यानंतर खाली “हय कोण टाकीत कचरो तेका दिसाचो नाय पुढचो दसरो” अशी थेट धमकी दिली आहे. म्हणजेच जर यापुढे कुणी जर कचरा टाकला तर अशी अद्दल घडवू की पुढच्या वर्षी तुम्ही दसरा सण बघणार नाही अशी अवस्था होईल. ही पाटी पाहून आता कुणी चुकूनही कचरा टाकण्याची हिम्मत करणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “आमच्या इथून निघालेल्या सुंदर मुली…” पुण्यात पार्लरबाहेर खास मुलांसाठी लावलेली पाटी वाचून पोट धरुन हसाल

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. मात्र या शैलीतल्या पाट्या आता सर्वत्र पाहायला मिळतात.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा फोटो asmi15678 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी भन्नाट वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “कोकणात राहणारा पुणेकर” तर आणखी एकानं प्रतिक्रिया देत हाच खरा पुणेकर अशी प्रतिक्रिया दिली आहे.