आनंद हा आयुष्यातील प्रत्येक क्षण मनासारखा जगण्यात असतो. हा आनंद तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून मिळू शकतो. कोणाला नृत्य करून आनंद मिळतो कोणाला डान्स करून आनंद मिळतो. विशेष म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे कसलेही बंधन नसते. हेच सिद्ध करणारा एका आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आजीबाई एका प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर नाचत आहे. आजीबाईंचा उत्साह आणि उर्जा पाहून नेटकरी थक्क झाले आहे. आजीबाईंचा हा व्हिडीओ तरुणाईला आंनदाने आयुष्य जगण्याची प्रेरणा देत आहे.
आपल्यापैकी अनेक तरुण नोकरी-कॉलेज अन् धावपळीच्या आयुष्यामध्ये जगणे विसरून जातो. ना व्यायाम करतो, ना कोणता छंद जोपासतो. दुसरीकडे वयोवृद्ध असूनही या आजीबाई उत्साहात नाचत आहे. व्हायरल व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये मेंहदीचा कार्यक्रम सुरु आहे जिथे कुटुंबियांबरोबर आजीबाई उत्साहात नाचत आहे. कजरा रे या बंटी और बबली या चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर आजीबाई थिरकत आहे. कजरा रे हे गाण्यात ऐश्वर्या रायने केलेल्या डान्सची आजही लोक स्तुती करतात. व्हायरल व्हिडीओमध्ये आजीबाईंनी या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे थेट ऐश्वर्या रायला टक्कर दिली आहे. आजीबाईंचा उत्साह अन् उर्जा इतकी आहे की तरुणाई देखील लाजेल. नाचताना आजीबाईंच्या चेहऱ्यावरी हावभाव नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांना आजीबाईंच्या उत्सहाचे कौतुक केले.
एकाने कमेंट केली की, “खूप छान आजी”. तर दुसरा म्हणाला की, “लय भारी आजी बाई”
तिसऱ्याने कमेंट केली की, “हेच खरं जगणं आहे.”
चौथ्याने लिहिले “असं काही अधून मधून बघायला मिळते म्हणून इंस्टाग्राम डिलीट करत नाही. हा खरा आनंद आहे”
पाचव्याने लिहिले की, “कडक! छान आनंद घेत आहेत आजीबाई त्यांच्या आयुष्याचा”