scorecardresearch

Premium

आफ्रिकन पुजाऱ्याने भारतीय पद्धतीने केली नवीन कारची पूजा! संस्कृतमध्ये केले मंत्रपठण; नेटकऱ्यांचे जिंकले मन!

आफ्रिकेत राहणाऱ्या पुजाऱ्याने त्याच्या नवीन गाडीची पूजा भारतीय पद्धतीने केली आहे.

An African priest worshiped a new car with chanting Sanskrit Mantra
(सौजन्य:ट्विटर/@gsv_ramu) आफ्रिकन पुजाऱ्याने भारतीय पद्धतीने केली नवीन कारची पूजा!

भारतीय परंपरेनुसार एखादी नवीन गाडी किंवा घर खरेदी केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा त्याची पूजा केली जाते. ही परंपरा परदेशातसुद्धा फॉलो केली जात आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका परदेशी जोडप्याच्या लग्नात पुजारी संस्कृतमध्ये मंगलाष्टके म्हणताना दिसले होते. आज एका आफ्रिकेत राहणाऱ्या पुजाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या पुजाऱ्याने त्याच्या नवीन गाडीची पूजा भारतीय पद्धतीने केली आहे.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, परदेशातील पुजारी खांद्यावर टॉवेल घेऊन उभा आहे. समोर त्याची एक नवी कोरी गाडी उभी आहे. त्या गाडीची पूजा करण्यासाठी त्याने पूजेचे ताटसुद्धा तयार करून घेतले आहे आणि त्यात पूजेसाठी आवश्यक गोष्टी ठेवल्या आहेत. तसेच खास गोष्ट अशी की, हा पुजारी संस्कृत भाषेत श्लोक म्हणताना दिसत आहे. या पुजाऱ्याने कशा प्रकारे भारतीय पद्धतीने पूजा केली ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

Sony Group explores new opportunities after parting ways with Zee
‘झी’शी फारकतीनंतर सोनी समूहाकडून नवीन संधींचा शोध
nephew took a ransom of rs 1 crore from a retired midc officer
एमआयडीसीच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून भाच्यानेच घेतली एक कोटी रुपयांची खंडणी
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : एकाच अर्थसंकल्पात ५० वर्षांच्या गप्पा!
maldives
भारतीयांनी मालदीवकडे फिरवली पाठ; भविष्यात भारतीय पर्यटक मालदीवला भेट देणार का?

हेही वाचा…Viral Video: मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा! दोस्ताला मृत्यूच्या दारातून खेचलं, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

व्हिडीओ नक्की बघा :

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, आफ्रिकन पुजारी नवीन गाडी विकत घेतो. तसेच या नवीन गाडीची पूजा अगदीच भारतीय पद्धतीने करतो. गाडीची पूजा करताना पुजारी पाणी शिंपडत व तीर्थाचे ग्रहण करीत तो संस्कृतमध्ये श्लोक म्हणताना दिसत आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तसेच नंतर हात जोडून, डोळे बंद करून तो मनोभावे पूजा करतानाही दिसून आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gsv_ramu या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “ही व्यक्ती आफ्रिकन पुजारी आहे आणि तिच्या नवीन कारची पूजा करीत आहे” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण पूजेदरम्यान आफ्रिकन पुजाऱ्याच्या स्पष्ट उच्चारांचे विविध शब्दांत कौतुक करताना दिसून आले आहेत

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An african priest worshiped a new car with chanting sanskrit mantra asp

First published on: 08-12-2023 at 19:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×