Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. काही व्हिडीओ खळखळून हसवणारे असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी चक्क मेकअप करण्याची बोलून दाखवत आहे. तिच्या या इच्छेमागील कारण जाणून घ्याल तर तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओ एका पार्लरमधील आहे. येथे एक आजी येते आणि तिला मेकअप करायला आहे, असे सांगते त्यावर मेकअप आर्टिस्ट तिला विचारते की मेकअप का करायचा आहे तर त्यावेळी आजी जे काही उत्तर देते ते पाहून तुम्हीही भावूक व्हाल. आजी सांगते की तिने सोनोग्राफी केली त्यानंतर ती पोटाच्या डाव्या बाजूला हात लावून सांगते की येथे गाठ दिसली. “उद्यापासून केमो द्यायचे आहे. डोकं उडून जाईल माझं. भाऊची इच्छा आहे की मेकअप करावा. मग माझा फोटो लावेल घरात.” आजीचा हे शब्द ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.
पुढे व्हिडीओत मेकअप आर्टिस्ट आजीचे नीट केस धुऊन देते त्यानंतर तुम्हाला पुढे व्हिडीओत मेकअप केलेल्या आजीचा फोटो दिसेल. आजी मेकअपमध्ये खूप सुंदर दिसतेय. त्यानंतर मेकअप आर्टिस्ट आजीला विचारते, “आजी इच्छा पूर्ण झाली ना” त्यावर आजी स्मित हास्य करत म्हणते, “हो” हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या आजीची आठवण येईल.

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण करुन मनभरून जगून घ्यावं. आजी व्हिडीओत सांगते की उद्यापासून केमो द्यायचे आहे, त्यावरुन कळते की आजीला बहूतेक कर्करोग झाला असावा. व्हिडीओत याचा उल्लेख नाही त्यामुळे आपण दावा करु शकत नाही पण आजीच्या बोलण्यावरुन असा अंदाज बांधला जाऊ शकतो.

हेही वाचा : बापरे! क्षणभरासाठी आई वडील घाबरले, खोडकर चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून डोकं धराल

dreams.makeupartist_184 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ओजस महाजन या मेकअप आर्टिस्टनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही तिच आर्टिस्ट आहे जीने आजीचा मेकअप केला. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझ्या या कामामुळे जर कोणाची एक इच्छा पूर्ण होत असेल तर अजून मला काय पाहिजे. उद्याची वाट पाहू नका प्रत्येक क्षण जगा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान ताई, तुम्हाला पुण्य लाभेल” तर एका युजरने लिहिलेय, “भावूक करणारा व्हिडीओ” अनेक युजरने भावूक होणारे इमोजी शेअर केले आहेत.