लहानपणी तुम्हीसुद्धा अनेकदा कागदापासून बोट किंवा विमान तयार केले असतील. अनेकांच्या शाळेत कार्यानुभव असा एक विषय असायचा, त्यात घोटीवपेपरपासून अनेक वस्तू तयार कश्या करायच्या हे शिकवलं जायचं. तर तुम्ही ओरिगामीबद्दलसुद्धा अनेकदा ऐकलं असेल. ओरिगामी म्हणजे कागदाला विशिष्ट पद्धतीने तसेच विशिष्ट क्रमाने घड्या घालून त्याला आकार देणे आणि विविध वस्तू, गोष्टी तयार करणे. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे आणि लहानपणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक खास ओरिगामी ट्युटोरियलचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती कागदापासून एक विमान तयार करते आहे. तिने एक पांढऱ्या रंगाचा कागद घेऊन त्याला कशाप्रकारे घडी घातली आणि त्याला कात्रीने कापून कसा आकार दिला, हे व्हिडीओत दाखवलं आहे. त्यानंतर विमान तयार झाल्यावर व्यक्ती शेतात या विमानाला हवेत उडवताना दिसून आली आहे. लहानपणाच्या आठवणी ताज्या करणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…कशी केली जाते रेल्वेच्या डब्यांची सफाई? मध्य रेल्वेने पोस्ट केलेला व्हिडीओ होतोय व्हायरल

पोस्ट नक्की बघा :

पेपरपासून विमान बनवणारा चॅम्प :

हा व्हायरल व्हिडीओ सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि त्यांनी तो त्यांच्या अकाउंटवरून रिपोस्ट केला आहे. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेय की, आजच्या मुलांना इंटरनेटचे शैक्षणिक फायदे नक्कीच मिळत आहेत. पण, माझ्या लहानपणी मी खरोखरच जर काही गमावलं असेल तर ते या व्हिडीओत आहे. या ट्युटोरियलमुळे मी लहानपणी माझ्या वर्गातील पेपरपासून विमान बनवणारा (पेपर प्लेन मेकिंग) चॅम्प होऊ शकलो असतो; अशी मजेशीर कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @anandmahindra यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना त्यांचे लहानपणीचे दिवस आठवले आहेत आणि म्हणून ते त्यांच्या भावना विविध शब्दांत कमेंटमध्ये मांडताना आणि सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना विविध मजेशीर प्रश्न विचारताना दिसले आहेत.