सामान्य जोडप्याला श्रीमंत जोडपे अचानक भेटले, अशी कल्पनाच अनेकांना रोमांचित करते. स्वित्झर्लंडमध्ये कंटेंट क्रिएटर प्रियंका मेहताला नेमकी अशीच अनपेक्षित भेट झाली ती भारतातील सर्वात श्रींमत जोडपे अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांची. भारतातील अंबानी कुटुंबातील उद्योजक आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि त्याची पत्नी व प्रतिष्ठित व्यापारी परिवारातील सदस्य असलेली राधिका मर्चंट यांना कंटेंट क्रिएटर अचानक भेटली. या अचानक भेटीची सर्वत्र चर्चा होत आहे.
“स्वित्झर्लंडमध्ये अचानक श्रीमंत जोडपे भेटले
अंअनंत अंबानी-राधिका मर्चंट हे जोडपे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. पण सध्या एक कंटेंट क्रिएटरला अनंत आणि राधिका अचानक भेटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्फ्लुएंसर प्रियंका मेहता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओची सुरुवात इन्फ्लुएंसर जोडप्याच्या आश्चर्यचकित प्रतिक्रियांपासून होते, जेव्हा त्यांनी अंबानी जोडप्याला पाहतात. स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर सामान्य जोडप्याप्रमाणे ते भटकंती करताना दिसत आहेत. कोणतीही सिक्युरटी नाही किंवा श्रींमतीचा दिखावा नाही. एवढंच नाही भारतातील श्रींमत असूनही अगदी सामन्य लोकांप्रमाणे त्यांना सामन्य जोडप्याबरोबर फोटो देखील काढला.
प्रियंका मेहता यांनी व्हिडिओला “Getting Rich Vibes” असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये अनंत अंबानी रस्त्याच्या काठावर उभे राहून राधिका मर्चंटचे हात धरलेला दिसत आहेत. व्हिडिओवरील मजकूमध्ये लिहले आहे: “या ग्रहावरील सर्वात श्रीमंत लोकांना सामन्यपणे भेटणे.” हा पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने पसरला असून एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
काय म्हणाले नेटकरी:
- “अनंत आणि राधिका खूप गोड आहेत.”
- “खूप छान फोटो आहे.”
- “फक्त रिच व्हायब्स.”
- “तुम्ही खूप भाग्यवान आहात.”
अलीकडेच अंबानी कुटुंबाच्या गणपती सोहळ्याचे “Antilia Cha Raja” या नावाने भव्य फेअरवेल व्हिडिओ व्हायरल झाले होते. या सोहळ्यात कुटुंबीय, मित्र आणि कर्मचारी सजवलेल्या वाहनाबरोबर राहात होते, आणि काही अंबानी कुटुंबीय त्याबरोबर चालत होते. सोहळ्यातील एक खास क्षण म्हणजे राधिका मर्चंटने अनंत अंबानीवर केशरफुले टाकण्याचा व्हिडिओ. अनंत त्याचे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात, पण राधिकाचा बॉडीगार्ड त्वरित प्रतिसाद देत तिच्या अंगावर फुले पडण्याआधीच मध्ये येतो.
अनंत अंबानी-राधिका मर्चंट हे बालपणीचे मित्र असून, २०१८ मध्ये त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे जोडपे चर्चेत आले.. हे १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांचा भव्य विवाहसोहळा पार पडला.