Viral Video: आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये कोरण्यासाठी अनेक जण अजब-गजब स्टंट करीत असतात. कोणी डोक्यानं नारळ फोडतात, तर काही साबणाच्या तयार झालेल्या बबलमध्ये रुबिक क्यूब सोडवून दाखवतात, तर कोणी हाताने विटा फोडतात. आता एका तरुणानं या सगळ्यांना मागे टाकत हात, पायानं किंवा डोक्यानं नाही तर चक्क दातांनी अक्रोड फोडण्याचा पराक्रम केला आहे. अजब विक्रम करणाऱ्या या तरुणाबद्दल या लेखातून सविस्तर जाऊन घेऊया…

आंद्रे ऑर्टॉल्फ असे या जर्मन तरुणाचं नाव आहे. एका टेबलावर दोन प्लेटमध्ये काही अक्रोड ठेवण्यात आले आहेत. तरुणाला एक मिनिटाचा वेळ दिलेला असतो. त्या एक मिनिटात त्याला जास्तीत जास्त अक्रोड फोडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वतःचे नाव कोरायचे असते. वेळ सुरू होताच तरुण प्लेटमध्ये ठेवलेले एकेक अक्रोड उचलून दातांनी फोडण्यास सुरुवात करतो आणि एकूण ४४ अक्रोड फोडतो. हे पाहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (GWR) यांनी या अनोख्या विक्रमाची नोंद घेतली आहे. तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा हा अनोखा विक्रम.

हेही वाचा…कुरळ्या केसांना पाहून पक्षी गोंधळला, घरटं शोधू लागला अन् …; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘आज आईचे शब्द…’

व्हिडीओ नक्की बघा…

अक्रोड फोडण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. अनेक लोक हे अक्रोड फोडण्यासाठी हातोडीचा वापर करतात; पण या तरुणानं हातोडीचा वापर न करता, स्वतःच्या दातांनी अक्रोड फोडले आहेत. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, आंद्रे ऑर्टोल्फने एका मिनिटात सर्वाधिक अक्रोड दातांनी फोडण्याचा करण्याचा विक्रम केला आहे. त्याला एकूण ४४ अक्रोड फोडण्यात यश मिळालं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने हा अनोखा विक्रम ओळखला आणि इन्स्टाग्रामवर या व्यक्तीच्या पराक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर या व्हिडीओला २.५२ लाख व्ह्युज मिळाले आहेत. आंद्रे ऑर्टोल्फ यांनी गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड्समध्ये स्वतःचे नाव कोरले आहे. २०२३ मध्ये नवीन कुमार नावाच्या भारतीय मार्शल आर्टिस्टने डोक्याने अक्रोड फोडले होते. त्यांनी एका मिनिटात सुमारे २७३ अक्रोडांचे तुकडे केले होते. आज आंद्रे ऑर्टोल्फ या तरुणाने चक्क दातांनी ४४ अक्रोड फोडून हा अनोखा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या विक्रमावर आश्चर्य व्यक्त करताना दिसले आहेत.