बॉलिवूडच्या एव्हरग्रीन कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता अनिल कपूर यांचे नाव सर्वात वर आहे. त्यांच्या काम करण्याच्या उत्साहावरून त्यांच्या वयाचा अंदाजच बांधता येत नाही. ६५ वर्षीय अनिल कपूर अजूनही अतिशय फीट आणि तंदुरुस्त आहेत. ते बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे डुप्लिकेट्स आपण नेहमी पाहतो. आता यामध्ये अनिल कपूर यांच्या नावाचीही भर पडली आहे. अनिल कपूर यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती यूएसस्थित फिटनेस कोच आहे. या व्यक्तीने अनिल कपूर यांच्या फोटोसह कोलाज केलेला एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यानंतर नेटकऱ्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

या व्यक्तीचे नाव आहे जॉन. त्याने अनिल कपूर यांचा ९०च्या दशकातील मिशी असलेला एक फोटो स्वतःच्या फोटोसह शेअर केला आहे. यामध्ये त्याने आपली फीट बॉडी फ्लॉन्ट केली आहे. हा कोलाज शेअर करताना जॉनने कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘मी खरं तर त्या बॉलिवूड कॉलची वाट पाहत आहे. तो कुठे आहे? माझे वडील म्हणायचे, अनिल कपूर एक महान अभिनेता आहे.’

काहीच न बोलता टिकटॉकर Khaby Lame एका पोस्टमागे कमावतो ‘इतके’ रुपये; विराट कोहलीची कमाईही थक्क करणारी

जॉनने पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. नेटकऱ्यांनी जॉनच्या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, ‘तुला खिलाडी बनाव लागेल आणि वन टू का फोर, फोर टू का वन, शिकावे लागेल.’ दुसऱ्याने म्हटलंय, ‘मला खरंच वाटलं, तू अनिल कपूर आहेस.’ एका युजरने तर अतिशय भन्नाट कमेंट केली आहे. त्याने लिहलंय, ‘भाई तुझ्या शरीरावर केस कमी आहेत, नॉट व्हॅलिड’

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह तब्बल ६०० कंपन्यांची चिंता वाढली; नेमकं कारण काय?

सिद्धार्थ आनंदच्या आगामी ‘फाइटर’ या चित्रपटामध्ये अनिल कपूर दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्यासह दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन आहेत. रणबीर कपूरच्या ‘पशु’मध्येही ते दिसतील. तसेच, ते ‘नो एन्ट्री’च्या सिक्वेलचाही एक भाग आहेत. त्याचबरोबर ब्रिटिश थ्रिलर सीरिजच्या हिंदी रिमेकमध्ये ते आदित्य रॉय कपूर आणि शोबित धूलिपालासह दिसतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor duplicate set the internet ablaze netizens said the hair on your body is less not valid pvp
First published on: 20-09-2022 at 11:04 IST