राजस्थानमध्ये रामलीला सुरू असताना एक दु:खद घटना घडली आहे. रामलीला सुरु असताना हनुमानाची भूमिका करणा-या ६२ वर्षीय धन्नाराम डेलू यांचा तारेवरून कोसळून दुर्दैवी अंत झाला आहे. धन्नाराम डेलू हे गेल्या अनेक वर्षांपासून रामलीलेत भूमिका करत होते. दस-याच्या दिवशी मात्र ही रामलीला त्यांची अखेरची रामलीला ठरली. रामायणातील संजीवनी आणण्याचे एक दृश्य करत असताना तार तुटून त्यांचा मृत्यू झाला आहे. अचानक तारेवरून चालताना संतुलन ढासळल्याने त्यांचा तोल गेला आणि ते ५० फूटांवरुन खाली कोसळले. हनुमान संजवीनी घेऊन निघाले असल्याचे एक दृश्य ते करत होते. यासाठी मंडपात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी तार बांधण्यात आली होती. ही तार ओलांडत असताना त्यांचे संतुलन ढासळले आणि ते तारेवरून ५० फूट खाली कोसळले. यात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धन्नाराम हे गेल्या ३५ वर्षांपासून रामलीलेत काम करत आहे. रामलीलेत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहे. ही रामलीला सुरु असताना उपस्थित प्रेक्षक हे दृश्य कॅमेरात कैद करत होते. त्यांची काही शेवटची दृश्य मोबाईलमध्ये चित्रित झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artist playing lord hanuman dies at ram leela
First published on: 13-10-2016 at 19:12 IST