Lucknow Summit Building Dispute Video : नशेच्या आहारी गेलेले लोक अनेकदा संकटांना आमंत्रित करतात. काही मद्यपी भान विसरून रस्त्यातच गोंधळ घालण्यास सुरुवात करतात. अशाच प्रकारे एका इमारतीबाहेरील परिसरात एका मद्यधुंद तरुणीने तिथे उभ्या असलेल्या तरुणांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धिंगाणा घातला. ही तरुणी काही तरुणांशी गैरवर्तन करताना आणि भांडण करताना दिसली. धक्कादायक म्हणजे ती मारण्यासाठी एका तरुणाच्या अंगावर धावत गेली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर खूपच व्हायरल होत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील गोमती नगरच्या समिट बिल्डिंगमधील असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, दरम्यान, समिट बिल्डिंग ही अनेकदा मद्यपींचा गोंधळ, मारामारी व अश्लीलता यांसारख्या घटनांमुळे चर्चेत असते. त्यात आता ही नवी घटना समोर आल्याने येथील नागरिक कायदा- सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. समिट बिल्डिंगमधून वारंवार घडणाऱ्या अशाच घटनांमुळे अनेकांनी संस्कृतीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनौची प्रतिमा मलीन होत असल्याचे मत मांडत संताप व्यक्त केलाय.

पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मद्यधुंद अवस्थेत एक तरुणी एका पबबाहेर उभी राहून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. त्यावेळी ती शिवीगाळ करता करता रागाने तरुणांच्या एका घोळक्याच्या दिशेने धावत जाते आणि त्यातील एका तरुणाला जोरजोरात शिवीगाळ करीत थेट मारहाण करू लागते. यावेळी प्रतिकारासाठी तो तरुणही तरुणीला मारतो. या घटनेमुळे इमारत परिसरात एकच गोंधळ उडतो.

या प्रसंगी बरेच लोक भांडण सोडविण्यासाठी म्हणून पुढे येतात आणि त्या भांडणाऱ्या तरुण व तरुणीला दूर करतात. यावेळी तिथे उभे असलेले काही सुरक्षा कर्मचारीही भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी करतात आणि जमावाला पांगवितात.

हा व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर बराच व्हायरल होताना दिसतोय; ज्यावर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांसाठी समिट बिल्डिंगच्या परिसरातील नाईट पब जबाबदार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलेय.

मार्चमधील घटनेची पुनरावृत्ती

लखनौच्या समिट बिल्डिंगमध्ये दारूच्या नशेत मारामारीच्या घटना वारंवार घडत आहेत. या वर्षी मार्चमध्ये लखनौच्या लोहिया पार्क चौकात काही तरुण रस्त्याच्या मधोमध भांडताना दिसले. यावेळी दारूच्या नशेत तरुणांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर काही तरुण एकमेकांना चक्क बेल्टने मारहाण करत होते. त्या घटनेचाही व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.