सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील बहुतांश व्हिडीओ लग्न समारंभाशी संबंधित असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला थक्क करतात तर काही हसून हसून पोट धरायला लावतात. सध्या एका लग्नातील असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.

खरं तर लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस असतो. या दिवशी वधू आणि वर सात जन्म एकत्र राहण्याचे एकमेकांना वचन देतात. पण ऐन लग्न समारंभात वधू-वर एकमेकांशी भांडू लागले तर? कदाचित तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये नवधू-वर स्टेजवरच एकमेकांशी भांडताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते एकमेकांना मारहाणदेखील करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- शेतकऱ्याचा नादच खुळा! केदारनाथ यात्रेसाठी थेट जिल्हाधिकाऱ्याकडे हेलिकॉप्टर तिकीटची मागणी; म्हणाला “पैसे घ्या पण…”

सोशल मीडियावर आपण भांडणाचे किंवा मारामारीचे अनेक व्हिडीओ पाहत असतो. असे व्हिडीओ व्हायरल होणं आता सामान्य झालं आहे. पण स्वत:च्या लग्नात वधू-वराला एकमेकांशी भांडताना तुम्ही कधी पाहिलं नसेल. पण सध्या असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधु-वर स्टेजवरच एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.

हेही पाहा- “आईची माया…” मुलगा मिटींगमध्ये बिझी, काळजीपोटी आईने केला मेसेज; WhatsApp चॅटींगचा स्क्रीनशॉट पाहून नेटकरी भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@gharkekalesh meme ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ऐन लग्न समारंभात वधू-वर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये पती आपल्या होणाऱ्या पत्नीला काहीतरी भरवताना दिसत आहे. पण यावेळी तो जबरदस्ती करतो. पतीने केलेली जबरदस्ती पत्नीला आवडत नाही आणि ती थेट त्याच्या कानशिलात लगावते, नवरीने मारताच नवरा मुलगाही रागवतो आणि दोघांमध्ये जोराचं भांडण सुरु झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून या व्हिडीओमुळे आमचं मनोरंजन झाल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत.