Mumbai-Navi Mumbai Atal Setu Bridge : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि आज १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन सुद्धा झालं आहे. मुंबईतील शिवडी येथून सुरु होणारा आणि नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणारा अटल सेतू २१.८० किमी लांबीचा आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीने हा प्रकल्प साकारला आहे. तर या मार्गावरून प्रवास करण्याची नागरिकांबरोबरच एका प्रसिद्ध व्यापारी यांना सुद्धा खूप उत्सुकता आहे.

भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष “आनंद महिंद्रा” अनेक नवीन प्रकल्प घेऊन येत असतात. तसेच सोशल मीडियाच्या अनेक युजर्सचे कौशल्य पाहून त्याचे कौतुक सुद्धा करीत असतात. तर आज त्यांनी अटल सेतूची पहिली झलक पाहून अगदीच सुंदर प्रतिक्रिया दिली आहे आणि या सेतूचे बारसं करत एक खास नाव ठेवलं आहे. आनंद महिंद्रा यांनी अटल सेतूचे नाव काय ठेवलं हे तुम्हीसुद्धा एकदा पोस्टमधून बघा.

हेही वाचा…Viral Video: तरुण सायकलवर झाला स्वार अन् भारत ते ऑस्ट्रेलियाचा केला ‘असा’ प्रवास…

व्हिडीओ नक्की बघा :

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतूची रात्रीच्या वेळेची ही झलक आहे. शहर जोडण्याची क्षमता आणि अर्थव्यवस्थेला यामुळे वाव मिळणार आहे. या ‘गोल्डन रिबन’ (Golden Ribbon ) वरून जाण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे असे म्हणत त्यांनी या अटल सेतू अगदीच अनोखं नाव ठेवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रात्रीच्या वेळी अटल सेतूवर दिसणारा सोनेरी प्रकाश, आजूबाजूला समुद्र आणि खाडीचा परिसर आणि अंधारात उजळून दिसणारा हा सोनेरी सी लिंक पाहून आनंद महिंद्रा यांनी या सेतूला ‘गोल्डन रिबन’ असे नाव ठेवले आहे ; जे अगदीच अनोखं आहे.