Viral Video : सध्या देशात आयपीएल सुरू आहे. आयपीएल २०२४ च्या हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात या दोन्ही संघाचा पहिला सामना चांगलाच चर्चेत आला. मुंबई इंडियन्सने दरवर्षी प्रमाणे पहिली मॅच देवाला दिली आणि गुजरात टायटन्सच्या पदरी यश आले. या खास सामन्यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सची मालकिण नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोक त्यांना पैसे मागताना दिसून आले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्यक्तीने नीता अंबानीला मागितले पैसे

CSK fans teach dance steps to cheer girls
VIDEO : CSK च्या चाहत्यांनी भर स्टेडियममध्ये शिकवला चीअर गर्ल्सना डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा
KKR Fan tried to steal ball video viral
KKR च्या चाहत्याने स्टेडियममध्ये बॉल चोरण्यासाठी केले अश्लील कृत्य, पँटमध्ये हात घातला अन्…; पोलिसांनी धक्के मारत काढले बाहेर, VIDEO व्हायरल
MS Dhoni announcement on way
CSK vs RR : एमएस धोनीचा चेन्नईत शेवटचा IPL सामना? CSK च्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांची वाढली धाकधूक
google lay off
Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!
justin trudeau,
जस्टिन ट्रुडो यांच्यासमोरच खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, भारताकडून निषेध; कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाठवले समन्स
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नीता अंबानी दूरवर उभी आहे आणि स्टेडियममधील लोक त्यांना जोरजोराने आवाज देत आहे. कोणी त्यांना नीता मॅम म्हणून आवाज दिला तर कोणी नीता काकी म्हणून आवाज दिला. नीता अंबानींना जेव्हा या लोकांचा आवाज ऐकू आला तेव्हा त्या मागे फिरल्या आणि त्यांना हात दाखवला. इतक्यात एका व्यक्तीचा आवाज आला जो मोठ्या आवाजात म्हणाला, “नीता मॅम दहा हजार पेटीएम करा” मात्र नीता अंबानीला हा आवाज ऐकू आला नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : होळीच्या दिवशी लोकांनी तोडले वाहतूक नियम, एकाच व्हिडीओमध्ये दिसली दोन प्रकरणे; व्हायरल होतोय व्हिडीओ

पाहा व्हायरल व्हिडीओ

bmsx2gang या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी मजेशीपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “जिओ अॅपवर माग, तुम्हाला मिळेल.” तर एका युजरने लिहिलेय, “फोनपे म्हणाला असता तर केले असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “टॉफी मागतोय का? कमीत कमी ५० लाख पेटिएम करायला सांगा.” एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “पुढच्या वेळी युपीआय क्युआर कोड छापलेलं टी शर्ट घाला”