Viral Rickshaw Funny Dialogue News: रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा ट्रॅकवर, टॅक्सीवर नाहीतर रिक्षावर भन्नाट असं काहीतरी लिहिलेलं वाचलं असेलच. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये रिक्षावाल्यानं रिक्षाच्या मागे जे काही लिहिलंय ते पाहून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका रिक्षाचा मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिक्षाचा फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीनं रिक्षातून प्रवास करताना समोर उभ्या असलेल्या रिक्षाच्या मागे लिहिला डायलॉग व्हिडीओमध्ये कॅप्चर केला आहे. जो वाचून सोशल मीडियावर या रिक्षा चालकाचे प्रचंड कौतुक केले जाते आहे. तुम्हाला आता उत्सुकता लागून राहिली असेल की नक्की काय रिक्षाचालकानं असं नेमकं लिहिलंय तरी काय?

रिक्षाच्या मागे कधी कधी इतक्या भन्नाट गोष्टी लिहिलेल्या असतात की आपल्यालाही वाचून आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी तेवढीच कमी असते. रिक्षा अशी काही नटवली सजवलीही जाते की आपल्याही नकळत आपली नजर त्या रिक्षेकडेच जाते. आपल्यालाही अशा रिक्षा पाहून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, त्या रिक्षाच्या मागे, असं लिहिलंय तरी काय? यामध्ये तुम्हाला रिक्षाचा मागचा भाग दिसेल ज्याच्या मागे रिक्षाच्या मागील बाजूला “गोत्यात आणणारी नाती पोत्यात घालून हानली पाहिजेत” असा डायलॉग लिहिला दिसेल.

पाहा फोटो

हेही वाचा >> PHOTO: “सरकार कोणाचे का असेना पण…” मराठी शाळेतील ही पाटी विचार करायला भाग पाडेल; प्रत्येकानं एकदा नक्की वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या डायलॉगवरून तुम्हालाही कळेल की या डायलॉगमध्ये किती दम आहे ते. हो, अशाच काही प्रतिक्रिया या या फोटोच्या खालीही उमटायला लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच या फोटोची चर्चा आहे. अनेकजण यावर सकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत. काहींनी रिक्षावाल्याच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी बरोबर लिहिलं आहे असं म्हटलंय. असं लिहिणाऱ्या या रिक्षा चालकाला उद्या त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून धोका मिळेल अशी खोचक टिप्पणीही काहींनी केली आहे. काहींनी रंजक अशा कमेंट्सही केल्या आहेत.@siddhant_rd नावाच्या एका ट्विटर युझरनं हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.