Bangladesh Ferry Crash: बांगलादेशचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका मोठ्या जहाजाखाली छोटी बोट येऊन बुडते (फेरी क्रॅश). हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात किमान अर्धा डझन लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण बेपत्ता आहेत. रविवारी खचाखच भरलेली बोट मालवाहू जहाजाला धडकली. राजधानी ढाकाजवळ शीतलक्षया नदीत एमव्ही रूपोशी-९ मालवाहू जहाज एमव्ही अफसरुद्दीनला धडकल्याने हा अपघात झाला.

नक्की काय झालं?

या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की मोठे जहाज लहान बोटीला काही मीटरपर्यंत कसे खेचते आणि नंतर बोट उलटते आणि पूर्णपणे पाण्यात बुडते. बोट बुडाण्यापूर्वी काही लोक जीव वाचवण्यासाठी नदीत उडी मारतानाही दिसत आहेत. मोठे व्यापारी जहाज थांबते पण बोट पूर्णपणे बुडाल्यावरच. हा व्हिडीओ जवळच असलेल्या दुसऱ्या जहाजात बसलेल्या लोकांनी टिपला आहे. मालवाहू जहाज बोटीला धडकल्यावर लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात.

(हे ही वाचा: ‘या’ आंब्याला मिळालीये चक्क ‘Z+ सुरक्षा’; हा व्हायरल Photo एकदा बघाच)

(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ Redditसह अनेक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ Reddit वर २५,००० पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. हा संपूर्ण व्हिडीओ पाहून काही यूजर्स हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या दिशेने उडी मारल्याने जीव वाचू शकतो यावर काही युजर्स बोलत आहेत की, ‘ज्यांनी बोटीच्या बाजूला उडी मारली ते जहाजाच्या इंजिनमध्ये ओढले गेले हे पाहणे कठीण आहे.