स्टार्टअप कंपनीमधून कर्मचारी कपात होत असल्याच्या अनेक बातम्या आपण रोज वाचत असतो. काही दिवसांपूर्वी सेकंड हँड कारमध्ये डिल करणाऱ्या स्टार्टअपने जवळपास ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करत जवळपास ३०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. एका अहवालही समोर आला होता ज्यानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला फक्त ७० टक्के स्टार्टअप्सने जवळपास १७ हडार लोकांना कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कित्येक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतात पण कोणीही हा विचार करत नाही की आता ते पुढे काय करतील, घर कसे चालवतील, आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरतील. पण बंगळुरूची एक कंपनी याबाबत अपवाद ठरली आहे. नुकतेच फिनटेक स्टार्टअप Farmने कर्मचारी कपात केली आहे पण चांगली गोष्ट ही आहे की फाउंडर्स स्वत:च आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दुसरी नोकरी शोधत आहे.
बंगळुरूच्या फिनटेक स्टार्टअप फार्मने नुकतेच घोषणा केली की ते आपल्या १८ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कंपनीने सांगितले की, ”बिझनेस मॉडेलमध्ये काही बदल केल्यामुळे कंपनीला ही निर्णय घ्यावा लागला. याबाबत कंपनीच्या फाउंडर्सने ट्विटरवर घोषणा केली आणि त्याचबरोबर अनेक स्टार्टअप फाउंडर्स, कंपन्या आणि रिक्रुटर्सला विनंती केली की तर त्यांच्याकडे EPD आणि Growth च्या पदासाठी कोणत्याही जागेची भरती होणार असेल तर त्यांच्याबरोबर संपर्क साधावा.”
ट्विटरवर मागितली मदत,
या स्टार्टअपचे को फाऊंडर्स संभव जैन आणि कुश तनेजा यांनी ट्विटरवर याबाबत ट्विट केले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपन्यां नोकरीची संधी देऊ शकतात. संभव जैंन यांनी लिहिले की, ”एका फाउंडरच्या भुमिकेमध्ये सर्वात अवघड असते आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना स्वत:पासून वेगळे करणे. आजचा दिवस फार अवघड आहे. कारण आमच्या स्टार्टअपच्या १८ लोकांना कंपनी सोडावी लागणार आहे. मार्ग वेगळे करण कधीही सोपे नसते विशेषत: आमच्यासारख्या स्टार्टअपसाठी जिथे लोकांना महत्त्व दिले जाते आणि प्रत्येकजण एकमेकांबरोबर भावनिकरित्या जोडलेले असतात.”
हेही वाचा – अचानक आकाशातून रस्त्यावर कोसळलं विमान अन्…..पाहा थरारक व्हिडीओ
कोणतीही नोकरी असेल तर आमच्याबरोबर संपर्क करा
त्यांनी पुढे सांगितले की, ”आम्हाला आमच्या टीमचा अभिमान आहे जी मी आणि कुश तनेजाने मिळून तयार केले आहे. आता कंपनीने आपले लक्ष हायपर ग्रोथवरून सस्टेनेबिलिटीकडे( मार्केटमध्ये टिकून राहण्याकडे) वळवले आहे. ज्यामुळे काही कर्मचाऱ्यांना कंपनीला निरोप द्यावा लागत आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, हे कर्मचारी जिथे जातील तिथे खूप चांगले काम करतील. मी सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. जर EPD आणि Growth च्या पदासाठी कोणत्याही जागेची भरती होणार असेल तर माझ्याबरोबर संपर्क साधावा. मला आमच्या मेहनती कर्मचाऱ्यांचे प्रोफाइल तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल.”
कुश तनेजा यांनी ट्विट करत सांगितले की, ”ते या कपातीसाठी कारणीभूत आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, ”या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्टार्टअपसाठी जे योगदान दिले आहे ते त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ राहतील.तसेच त्यांनी सांगितले की जर तुम्हाला पॅशनेट आणि एक्स्ट्राऑर्डिनरी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची असेल तर मला मेसेज करा.”
हेही वाचा – तब्बल ३ दिवस लिफ्टमध्ये अडकली होती महिला, मदतीसाठी ओरडत राहिली अखेर….
कंपनीच्या निर्णयावर काहींनी केली टिका, काहींनी केले कौतुक
ट्विटरववर अनेक लोक या कंपनीवर टिका करत आहेत, परंतु असे बरेच रिक्रूटर्स आहेत, ज्यांनी, त्यांच्या विनंतीला प्रतिसाद आहेत आणि ते सांगतात की, ”भलेही या कंपनीने १८ कर्मचाऱ्यांना नोकरी काढून टाकले आहे पण ज्या प्रकारे फाउंडर्सने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे ते खरचं कौतुकास्पद आहे.” कित्येकांनी कमेंट करत सांगितले की,टट त्यांच्याकडे जागा भरणार आहे.” कित्येक लोकांनी मेसेज देखील केले असावे.
ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे त्यांना खूप मदत होईल अशी आशा आहे कारण फाउंडर्सला त्यांच्यावर इतका विश्वास दाखविला आहे त्यामुळे इतर स्टार्टअपचे फाउंडर्स देखील प्रभावित झाले आहेत.