corporate work culture :आजच्या कॉर्पोरेट जगतात वेग, कामगिरी आणि परिणाम यांना इतकं महत्त्व दिलं जातं की, माणुसकी मागे पडली आहे. कामाचा वाढता ताण, डेडलाइनचा दबाव आणि ‘ऑफिस पॉलिसी’च्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या भावनांकडे केलेलं दुर्लक्ष — हे आता नित्याचं झालं आहे. खासगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्याचं संतुलन राखणं अवघड होत चाललं आहे. अलीकडेच बंगळुरूतील एका आयटी कंपनीतील तरुणीच्या अनुभवाने या विषयावरचं दुःखद वास्तव पुन्हा एकदा समोर आणलं आहे.

बंगळुरूतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने तिच्या आईचा अपघात झाल्यानंतर घरून काम करण्याची (Work From Home) परवानगी मागितली. मात्र कंपनीने विनंती नाकारलीच पण तिला पुरावे देखील मागितले. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट वाचून अनेकांनी संताप व्यक्त केला.

बेंगळुरूतील युवतीला घरून काम करण्यासाठी दिला नकार (Bengaluru woman denied WFH request)

रेडिटवर “भारतीय ऑफिस कल्चर खरोखरच विचित्र आहे. (Indian work culture is actually insane) या शीर्षकाखाली या घटनेची पोस्ट शेअर करण्यात आली. ती पोस्ट एका व्यक्तीने आपल्या वहिनीच्य अनुभवाबद्दल लिहिली होती.

त्या पोस्टनुसार, त्या युवतीच्या आईचा आणि भावाचा काही दिवसांपूर्वी स्कूटरवर अपघात झाला होता. आईचा हात फ्रॅक्चर झाला आणि भावाच्या चेहऱ्यावर तसेच हातावर जखमा झाल्या. त्यामुळे तिने कंपनीला एका महिन्याकरिता घरून काम करण्याची विनंती केली.

कॉर्पोरेट जगतातील करुणेचा अभाव (Lack of empathy in corporate culture)

“कंपनीने तिच्याकडून MRI स्कॅन आणि पोलिस रिपोर्ट मागितला. ती सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही कंपनीने ऑनलाईन मिटिंग घेऊन तिच्या विनंतीला नकार दिला. कारण सांगितले – टीममध्ये सध्या बँडविड्थ कमी आहे,” असे त्या व्यक्तीने रेडिटवर लिहिले.

त्याने पुढे नमूद केले की, “तिने सुट्टी मागितली नव्हती, फक्त घरून काम करण्याची परवानगी मागितली होती. तिचं काम ऑफिसमध्ये उपस्थित राहून करण्यासारखंही नव्हतं.”

Bengaluru woman WFH denied

नेटिझन्सचा संताप आणि प्रतिक्रियांचा पूर (Online outrage and public reaction)

याच अपघातात जखमी झालेल्या तिच्या भावाला फक्त दोन दिवसांचीच रजा मिळाली आणि तिसऱ्या दिवशी त्याला परत ऑफिसला बोलावले गेले, हेही त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले. एवढंच नाही तर दुखापत बरी झाली नसल्याने त्याचा छोटा भाऊ रोज त्याला ऑफिसला सोडत होता अन् घरी परत घेऊन येत होता.

“मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून अशा असंवेदनशील वागणुकीची अपेक्षा नव्हती. हे अत्यंत घृणास्पद आहे,” असा संतप्त सूर त्या पोस्टमध्ये उमटला.

नेटिझन्सचा संताप

या घटनेनंतर Reddit वरील वापरकर्त्यांनी कॉर्पोरेट जगतात माणूसकीला जागा नाही हे पाहून संताप व्यक्त केला

एका युजरने लिहिले,“माझ्या भावाचा अपघात होऊन त्याची बोटं कापली गेली होती. तो साउंड इंजिनियर आहे. सर्जरीनंतर दहा दिवसातच ऑफिसला बोलावलं. गेला नाही तर नोकरी गेली.”

दुसऱ्याने लिहिले,“माझ्या कंपनीत ऑफिसमधून काम करणं बंधनकारक आहे, पण अशा परिस्थितीत आम्हाला घरून काम करण्याची मुभा दिली जाते.”

अनेकांनी नमूद केले की, भारतात कॉर्पोरेट संस्कृतीत करुणा आणि समजूतदारपणाचा गंभीर अभाव दिसतो आहे. काहींनी तर म्हटले की, “यामुळे पुन्हा कौटुंबिक व्यवसायांकडे परत जाण्याची वेळ आली आहे.”

या घटनेबरोबर आणखी एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात एका तंत्रज्ञाने सांगितले की, कामाच्या ताणामुळे तो आपल्या वडिलांचा शेवटचा फोन घेऊ शकला नाही — आणि ते निधन पावले.