बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचा मुलागा तेजस्वी यादव तरुणींमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. त्यांची प्रसिद्ध इतकी आहे की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इथल्या मुलींनी त्यांना गुलाबांची फूलं देण्यासाठी रस्त्याच्या दूर्तफा गर्दी केली होती. हातात लाल गुलांबाचे फूल घेऊन इथल्या तरुणी त्यांची वाट बघत रांगेत उभ्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ३५ हजारात ‘मारुती ८००’ चे रुपडे पालटले

पटना मधल्या एका कार्यक्रमासाठी ते जात होते. ही बातमी महाविद्यालयातील मुलींना कळताच त्यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणींनी रस्त्यावर गर्दी केली होती. कॉलेजच्या कित्येक तरुणी हातात लाल गुलाबाचे फूल घेऊन रस्त्यावर उभ्या होत्या. एका हिंदी वाहिनीच्या वृत्तानुसार मुलींची गर्दी पाहून तेजस्वी यांनी गाडी थांबवण्याचे आदेश दिले आणि काही मुलींकडून फूलंही स्विकारली. काही मुलींनी त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छाही दिल्या.

वाचा : हॉटेल ‘हवाई अड्डा’मध्ये तुमचं स्वागत आहे!

असे प्रकार होण्याची ही काही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी राज्यातील तक्रारी निवारण्यासाठी तेजस्वी यादव यांनी फोन क्रमांक दिला होता. पण अनेक मुलींना मात्र तो त्यांचा खासगी क्रमांक आहे असे वाटले. त्यामुळे राज्यातल्या तक्रारी तर दूरच राहिल्या पण मुलींनी या क्रमांकावर लग्नाच्या मागण्या घालायला सुरूवात केली होती. या क्रमांकावर ४४ हजार मुलींनी मेसेज करून लग्नाच्या मागण्या तेजस्वी यांना घातल्या होत्या. तेजस्वी यादव यांचे अजूनही लग्न झाले नाही त्यामुळे तरुणींमध्ये ते जास्तच प्रसिद्ध आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar girls stand in long queue to give valentines rose to bihar deputy cm tejaswi yadav
First published on: 14-02-2017 at 19:57 IST